TIMES OF AHMEDNAGAR
नागरदेवळे :
नागरदेवळे या गावाची गाथा मांडता मांडता त्या गावाची कथा लिहिण्याची वेळ आता आली आहे. मागील काही दिवसांपासून नागरदेवळे व तेथील काही भामट्यांनी नागरदेवळे परिसराला आपल्या उदरनिर्वाहाचे साधन केले आहे. काहींनी चोऱ्या केल्या तर, काहींनी दहशत निर्माण करण्याचे काम केले. विकासाच्या नावावर स्वतःच्या कुटुंबाच्या विकासाला प्राधान्य या भामट्यांनी दिले असल्याचा आरोप वारंवार ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केला होता.
संग्रहित. स्त्रोत.सोशल मिडिया.
विकासकामांच्या नावावर स्वतःचा विकास.
नागरदेवळे येथील मिस्टर माजी.सरपंच याने नवीनच पराक्रम केल्याचे समोर आले आहे. नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीत अनेक अनधिकृत बांधकामांना या बहाद्दुराने बेकायदेशीर ग्रीन सिग्नल दिला आहे. कायदेशीर अधिकार नसलेला हा बहाद्दूर आहे. मिस्टर माजी. सरपंच बेकादेशीर पदाचा वापर करत हा आपला उदरनिर्वाह चालवत होता. आलमगीर भागातील प्रिंसला धरून अस्तित्वात नसलेल्या जागेवर बेकायदेशीर परवानगी घेऊन कच्च्या जमिनीवर यांनी आपला झेंडा गडाला आहे. कोणताही अधिकार नसतांना या बहाद्दुराने राजा हाताशी धरून बेकायदेशीर घरांच्या नोंदी घेतल्या आहेत.बेकायदेशीर नोंदी घेऊन या बहाद्दुराने प्रजाच भिकारी केली असल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थांच्या खासगी चर्चेतून मिळाली आहे. कच्च्या जागेवर अनधिकृत इमारती बांधायला हिम्मत देणाऱ्या या मिस्टर माजी. सरपंचाने बेकायदेशीर इमारतींच्या बांधकामासाठी कायदेशीर माल घेतल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
संग्रहित. स्त्रोत.सोशल मिडिया.
अनधिकृत बांधकामांचा हाच ठेकेदार. ?
शासकीय कामांचा निधी विकासकामांवर खर्च न करता हा निधी मधेच गायब झाला आहे. विशेष म्हणजे या मिस्टर माजी.सरपंचाने या सर्व कामांचे ठेके स्वतःच्या नावावर न घेता भाच्याच्या नावावर घेऊन वेगळाच धिंगाणा केला आहे. बेकायदेशीर काम करायला लावणाऱ्या या मिस्टर माजी.सरपंचाने स्वतः देखील बेकायदेशीर काम केल्याचे समोर आले आहे. बेकायदेशीर घरांच्या नोंदी घेऊन त्या जागेंवर इमारतींना बेकायदेशीर परवानगी मिस्टर माजी.सरपंचाने दिली आहे. विशेष म्हणजे या इमारती बनवण्याचे काम देखील हाच मिस्टर माजी.सरपंच ठेकेदार म्हणून घेत आहे. म्हणजे पुरा माल डब्बेमे अशा चर्चा सध्या नागरदेवळे येथे दबक्या आवाजात रंगल्या आहेत.