म्हणजे देशावरच हल्ला …..! भारतीय नागरिक किती सुरक्षित …..!
संसद भवन हल्ल्यातील आरोपी अफजलला १२ वर्षांनी फाशी तर दोघांना सुट्टी ….
भारतीय संसदेवरील हल्ला प्रकरणात चार अतिरेक्यांना अटक झाली.दिल्लीच्या पोटा न्यायालयाने १६ डिसेंबर २००२ रोजी मोहम्मद अफजल, शौकत हुसैन, अफसां आणि प्रोफेसर सैयद अब्दुल रहमान गिलानी असे चौघे दोषी असल्याचा निकाल दिला.सर्वोच्च न्यायालयाने प्रोफोसर सैयद अब्दुल रहमान गिलानी आणि नवज्योत संधू उर्फ अफसां गुरू यांना सोडलं. मात्र, मोहम्मद अफजलची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. शौकत हुसेनची फाशीची शिक्षा कमी करत त्याला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
९ फेब्रुवारी २०१३ रोजी अफजल गुरूला दिल्लीच्या तिहार तुरुंगात सकाळी ८ वाजता फाशी देण्यात आली.
देशभरातील जनतेच्या मनात असुरक्षिततेची दहशत निर्माण करणारी घटत आज दिल्ली येथे घडली. देशभरात खळबळ उडून देणारी बातमी आज घडली आहे.संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले. घोषणाबाजी केली. त्यानंतर तीन जण प्रेक्षक गॅलरीत आले. तिथून हे तिघेही सभागृहात शिरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. कोणतीही परवानगी नसताना आणि सभागृहाचे सदस्य नसताना तीन जण आत शिरल्याने सुरक्षा रक्षकांचीही तारांबळ उडाली.
नवी दिल्ली : संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले. घोषणाबाजी केली. त्यानंतर हे दोघेही गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीत आले. तिथून हे दोघेही सभागृहात शिरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. अचानक एक स्त्री आणि एक पुरुष सभागृहात आल्याने सर्वचजण धस्तावले. कोणतीही परवानगी नसताना आणि सभागृहाचे सदस्य नसताना दोन जण आत शिरल्याने सुरक्षा रक्षकांचीही तारांबळ उडाली. या दोघांना पकडण्यासाठी संसद भवनात एकच धावपळ सुरू झाली. या निमित्ताने संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर लोकसभेचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं.
संसद भवनात कोण आणि कशे घुसले ?
एक महिला आणि पुरुष एका खासदाराच्या पासवर संसदेत शिरले. संसदेच्या बाहेर आधी त्यांनी फटाके फोडले. यावेळी त्यांनी भारतमाता की जय, तानाशाही नही चलेगी… अशा घोषणा दिल्या. ट्रान्स्पोर्ट भवनाच्या बाहेर हा गोंधळ घालण्यात आला. यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाचा गॅसही फोडला. त्यामुळे संसद भवन परिसर पिवळा झाला होता. त्यानंतर हे दोघेही संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत आले. यावेळी त्यांनी जोरजोरात घोषणा देत संसद सभागृहात प्रवेश केला.
सुरक्षा रक्षकांनी घेतले ताब्यात.
अचानक दोन अज्ञात व्यक्ती संसदेच्या सभागृहात आल्याने एकच खळबळ उडाली. या दोघांना पकडण्यासाठी सुरक्षा रक्षक धावले. हे दोघेही सभागृहात इकडून तिकडे पळत होते. खासदारही या दोघांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या हातात टिअर गॅस होता. हा पिवळा गॅस घेऊन ते सभागृहात शिरले होते. त्यामुळे सर्वच जण धस्तावले होते. अखेर सुरक्षा रक्षकांनी या दोघांना जेरबंद केलं.
थेट संसद भवनात घुसण्याचे कारण काय ?
आमचं म्हणणं ऐकलं जात नाही. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलल्याचं त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. पोलिसांनी या महिलेला आणि पुरुषाला अटक केली असून त्यांना पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात नेलं आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. हे लोक कशासाठी शिरले होते कोणाच्या सांगण्यावरून आले होते, त्यांचा कुणाशी संबंध आहे, याची चौकशी केली जात आहे.
२२ वर्षापूर्वीची दुर्दैवी पुनरावृत्ती ?
आजच्याच दिवशी २२ वर्षापूर्वी म्हणजे १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. त्यावेळीही संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत. बरोबर २२ वर्षानंतर आजच दोनजण संसदेत शिरल्याने खळबळ उडाली आहे.
काय घडलं होत १३ डिसेंबर २००१ रोजी ?
१३ डिसेंबर २००१ रोजी दिल्लीच्या वातावरणात कोवळ्या किरणांनी संसद भवनाला आपल्या मिठीत सामाऊन घेतलं होत.आणि संपूर्ण देशाच लक्ष महिला आरक्षण विधेकाने आपल्याकडे आकर्षित करून घेतलं होता. संसदेत विरोधकांच्या गदारोळात हिवाळी अधिवेशन सुरू होतं. महिला आरक्षण विधेयकावरून गेले काही दिवस संसदेत गदारोळ सुरू होता.संसद परिसरात सभागृहाच्या आतपासून ते बाहेरपर्यंत सगळीकडे नेते, पत्रकार बिनधास्त फिरत होते, अनेकांच्या मनमोकळ्या गप्पा रंगल्या होत्या. सगळं रोजच्यासारखं सुरू होतं.संसदेत सर्वपक्षीय खासदारांसह पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी या देखील दाखल झाल्या होत्या.
११ वाजून ३० मिनिटं होत असतानाच उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षक त्यांच्या पांढऱ्या अँबेसिडर गाडीजवळ उभे राहून उपराष्ट्रापातींची येण्याची वाट बघत होते.तेवढ्यात डीएल.-३ सिजे-१५२७ क्रमांकाची एक पांढरी अँबेसिडर कार वेगाने गेट नंबर १२ जवळ आली. कारचा वेग संसदेत चालणाऱ्या इतर सरकारी गाड्यांपेक्षा थोडा जास्त होता.कारचा वेग बघून संसदेच्या वॉच अँड वॉर्ड ड्युटीवर असलेले जगदीश प्रसाद यादव घाई-घाईत निशस्त्रच गाडीच्या दिशेने धावले.
ही तेव्हाची घटना आहे जेव्हा लोकशाहीचं मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या सुरक्षारक्षकांकडे शस्त्रं नसायची. जगदीश यादव यांना पळताना पाहून इतर सुरक्षारक्षकही त्या वेगाने धावणाऱ्या गाडीच्या दिशेने पळाले. एवढ्यात ही पांढरी अँबेसिडर गाडी उपराष्ट्रपतींच्या गाडीला धडकली.उपराष्ट्रपतींच्या गाडीला धडकल्यावर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्यांच्या हातात AK-47 आणि हँडग्रेनेडसारखी आधुनिक शस्त्र होती.संसद परिसरातील वेगवेगळ्या भागात उभ्या लोकांनी गोळीबाराचा आवाज ऐकताच वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. कोणाला हा फटाक्यांचा आवाज वाटला तर कोणाला वाटल कि जवळच्याच गुरुद्वारामध्ये कुणीतरी गोळी झाडली असेल.
गोळ्यांचा आवाज अन नेत्यांना घाम …..!
संसद भवन परिसरात अतिरेक्यांनी AK-47 मधून बेधुंद झाडलेल्या गोळ्यांच्या आवाज ऐकताच नेत्यांसह तिथे उपस्थित लोकांचे चेहरे व शरीर भीतीने थरथरत होते. संसद भवनाच्या आतपासून बाहेरपर्यंत पळापळ सुरू झाली झोती . नेमकं काय घडतंय हे कोणालाही ताळमेळ नव्हतं. सगळेच आपापल्या परीने घटनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते.यावेळी सभागृहाच्या आत देशाचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांच्यासह अनेक बडे नेते हजर होते.सभागृहाच्या गेट नंबर १ च्या बाहेर केंद्रीय मंत्री मदनलाल खुराना यांच्याशी बातचीत करत उभे असलेले पत्रकार सांगतात, “मी मदनलाल खुराना यांना सांगितलं की हा सिक्युरिटी गार्ड बघा. याला काय झालं आहे ? तो गोळीबार का करतोय ? मला वाटलं तो कुणाचा बॉडीगार्ड असावा. ते मागे वळून बघणार एवढ्यात वॉच अँड वॉर्डच्या एका जवानाने त्यांचा हात धरून त्यांना खेचलं. ते आपल्या कारच्या दारावर हात ठेवून माझ्याशी बोलत होते आणि अशाप्रकारे ओढल्यामुळे ते जमिनीवर पडले. खुराना साहेबांनंतर त्या जवानाने माझा हात खेचून म्हटलं, खाली वाका. कुणीतरी गोळ्या झाडत आहे. वाकूनच आत जा. नाहीतर गोळी लागेल.
संसदेत ससंदीय कामकाज मंत्री प्रमोद महाजन, नजमा हेपतुल्ला आणि मदनलाल खुराना यासारखे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
संसदेत पहिल्या गोळीचा आवाज ऐकल्यानंतरच गोंधळ उडाला. यावेळी संसदेत ससंदीय कामकाज मंत्री प्रमोद महाजन, नजमा हेपतुल्ला आणि मदनलाल खुराना यासारखे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.मनोरंजन भारती सांगतात त्यावेळी संसदेतील सुरक्षारक्षकांकडे शस्त्रं नसायची. संसदेत सीआरपीएफची एक बटालियन असायची. मात्र, तिला घटनास्थळापर्यंत येण्यासाठी अर्धा किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार होतं. गोळ्यांचा आवाज येताच ते धावत आले.”उपराष्ट्रपतींचे सुरक्षारक्षक आणि अतिरेकी यांच्यात संघर्ष सुरू असताना निशस्त्र सुरक्षारक्षक मातबर सिंह यांनी आपल्या प्राणांची बाजी लावत गेट नंबर 11 बंद केलं.
देशाचे तत्कालीन मोठे नेते पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी संसदेत अडकले.आणि तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवानी घामाघून होऊन धावले ….!
आत अडकलेले पत्रकार सांगतात मदनलाल खुराना यांच्यासोबतच मलाही गेट नंबर एकच्या आत टाकत गेट बंद करण्यात आलं. सभागृहात मला दिसलं की गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी कुठेतरी जात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव आणि कपाळावरच्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या. मी त्यांना विचारलं की काय झालं आहे. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच ते तिथून निघून गेले.यानंतर खासदारांना सेंट्रल हॉल आणि इतरांना अन्यत्र हलवण्यात आलं. त्यावेळी मला सर्वांत मोठी चिंता लागून होती ती म्हणजे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी सुखरूप आहेत की नाही याची. गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी सुखरूप असल्याचं मी बघितलं होतं. मला नंतर कळलं की हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल केलेली कारवाई अडवाणी यांच्या देखरेखीत सुरू होती.
गेट ०१ च्या बाहेर अतिरेक्याने स्वतःला उडवून घेतलं होता.
ते पत्रकार सांगतात आम्ही एका खोलीत होतो. तिथे माझ्यासोबत ३०-४० जणांना ठेवलं होतं. जॅमर ऑन असल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे मोबाईल फोन बंद होते. आमचा जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. दोन-अडीच तासांनंतर एका मोठ्या स्फोटाचा आवाज आला. आवाज इतका मोठा होता की वाटलं संसदेचा एखादा भागच उडवून दिला आहे. नंतर कळलं की गेट नंबर एकच्या बाहेर एका अतिरेक्याने स्वतःला उडवलं होतं. संसद परिसरातील या संपूर्ण घटनाक्रमाला आपल्या कॅमेऱ्यात बंद करणारे कॅमरापर्सन अनमित्रा चकलादार सांगतात, “गेट नंबर एकवर एका अतिरेक्याला ठार केल्यानंतर दुसऱ्या एका अतिरेक्याने आम्हा पत्रकारांवर गोळीबार सुरू केला.यातली एक गोळी न्यूज एजेन्सी एएनआयचे कॅमेरापर्सन विक्रम बिष्ट यांच्या मानेला लागली. दुसरी गोळी माझ्या कॅमेऱ्याला लागली. आमच्या जवळच एक ग्रेनेडही येऊन पडला. मात्र त्याचा स्फोट झाला नाही. संध्याकाळी चार वाजता सुरक्षादलांनी येऊन आमच्यासमोर तो निकामी केला.