TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर :
माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे प्रतिस्पर्धी माजी.मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट व्हायरल झाली. ती पोस्ट व्हायरल होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या.तनपुरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भवना पाहायला मिळाली. तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.आपल्या साहेबांना आता विरोधकच राहणार नाही.आपले साहेब पुन्हा आमदार होतील अशा चर्चा बुऱ्हाणनगर भागात रंगल्या होत्या.माजी.आमदार शिवाजीराव यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे तनपुरे यांच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाउंटवरून हि पोस्ट व्हायरल का केली गेली याचे राजकीय भाकीत काय आहे असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
आमदार तनपुरे यांच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाउंटवरून व्हायरल झालेली पोस्ट काय आहे.
माफी असावी .. थांबतो आता… अशी फेसबुक पोस्ट माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावाने असलेल्या एका फेसबुक अकाउंटवरून व्हायरल झाली. या पोस्टच्या आधारे काही वृत्तपत्रात वृत्तही प्रसिद्ध झाले. पोस्ट वेगाने व्हायरल झाल्यानंतर संबंधित फेसबुक खात्यावरून अल्पावधीतच हि पोस्ट डिलीटही करण्यात आली. पण व्हायरल झालेल्या पोस्टमुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. या पोस्टवर मत जाणून घेण्यासाठी अनेकांनी आमदार तनपुरे यांच्याशी दिवसभर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार तनपुरे यांच्याशी संपर्क झाला नाही.आमदार तनपुरे हे संपर्क क्षेत्रात नसल्याने आणखीनच सस्पेन्स वाढला होता.
कर्डिलेंच्या स्वप्नावर पाणी ?
आमदार प्राजक्त तनपुरेंनी शिवाजीराव कर्डिले यांचा २०१९ च्या निवडणुकीत २२ हजार मतांनी पराभव केला होता. कर्डिलेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा झाली. मोदींची सभा देखील तनपुरेंच्या लोकप्रियतेला रोखू शकली नाही.मात्र तनपुरेंच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊट वरून व्हायरल झालेली पोस्ट हि कर्डिले यांच्या स्वप्नाला बळ देईल असे वाटत होते.मात्र तनपुरेंच्या त्या अकाऊट वरून ती पोस्ट तातडीने काढण्यात आली.
शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदार संघातून आमदार झाले होते.मात्र किंगमेकरची भूमिका निभावणारे भाजपचे नेते शिवाजी कर्डिले यांचा २०१९ च्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. नगरच्या राजकारणात नेहमीच शिवाजी कर्डिले चर्चेत असतात. पण राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंचा 22 हजार मतांनी पराभव केला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्डिलेंच्या प्रचारासाठी सभा देखील घेतली होती.मात्र त्या प्रचार सभेला अपयश आल्याचे तनपुरेंच्या विजयातून स्पष्ट झाले होते.