TIMES OF AHMEDNAGAR
हुक्यांच्या नावाखाली बुक्य्यांचा कार्यकम …..
अहमदनगर :- भारत देश हा डिजिटल देश म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. भारत देशात अनेक डिजिटल स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. डिजिटल भारताचे जेवढे फायदे आहेत तेवढे नुकसान देखील आहेच.अनेक तरुण मुले अनावधानाने का होईना गैरकृत्य करतात,तरुणांना जर त्याची कल्पना कोणी दिली तर तरूणाई त्यांना डिजिटल इंडियाची फॅशन असल्याचे म्हणत एका वाक्यात विषय संपवतात.
मागील अनेक दिवसांपासून शहरातील नागरिक आप-आपल्या मुलींना घेऊन चिंतीत असल्याचे चित्र आहे. काळजीपोटी आपल्या मुलींवर बारकाईने लक्ष ठेवणे हि प्रत्येक आई-वडिलांची जबादारी आहे.मात्र काही अॅडव्हान्स मुली आई-वडिलांची अब्रू थेट कॅफेंवर काढत आहेत. अनेक हुल्लडबाज मुली कॅफेंवर प्रियकरासोबत दारू पिणे, हुक्का पिणे, सिगारेट पिणे, अश्लील कृत्य करणे अशा गोष्टींचा आनंद घेत डिजिटल इंडियाची हि फॅशन असल्याचे सांगतात.अनेक ठिकाणी पोलिसांनी या मुला मुलींना रंगेहाथ पकडले होते.
पोलिसांची छातूर मातुर कारवाई ?
शहरातील अनेक ठिकाणी कॅफेंवर अश्लील कृत्यांचा अश्लील प्रकार जग जाहीर आहेच,अल्पवयीन मुली देखील या कॅफेंवर मज्जा-मस्ती करतांना पाहायला मिळतात. वरिष्ठाना काही तरी कारवाई दाखवायची म्हणून पोलीस इच्छा नसतांना देखील काही कॅफेचालकांवर कारवाई करतात या छातूर -मातुर कारवाईत कॅफेमालकांना काहीही फरक पडत नाही. असे कॅफे मालक खासगीत रंगलेल्या चर्चांमध्ये सांगतात.काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी थेट एल.सी.बी.च्या पोलीस निरीक्षकांना या कॅफेंवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कॅफेंवर मुले-मुली विचित्र प्रकार करतांना आढळून आल्यास संबंधितांच्या पालकांना बोलून घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत.स्थानिक पोलिसांच्यापेक्षा जास्त महत्व असलेल्या एल.सी.बी.च्या पथकाच्या कारवाईकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
कॅफे मालकांकडून स्थानिकांना पाच चे बक्षिश. ?
तोफखाना पोलिसांनी मागील अनेक दिवसांपासून हद्दीतील कॅफेंवर लक्ष ठेवले असल्याचे बोलले जात होते. मात्र कॅफेचालकांवर ठोस कारवाई करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. अनेक ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून प्रसार माधामांतून प्रसिद्ध मिळवली.मात्र कॅफेचालकांवर नियंत्र आणण्याचे काम पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेले असल्याचे बोलले जाते. त्याला कारणही तसेच आहे कारण कॅफे चालक पोलिसांना व त्यांच्या कारवाईला घाबरणार नाही हे जगाच्या पाठीवर शक्य नाही. कॅफे चालकांना बॉडीगार्ड मोहित संरक्षण देत आहे. मोहित या कॅफे चालकांकडून बंद पाकिटात त्या महिलांची अब्रू झाकून घेत आहे असा आरोप देखील काही नागरिकांनी केला आहे.
तोफखाना हद्दीत २५ ते ३० कॅफे ?
तोफखान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंदाजे पंचवीस ते तीस कॅफे असल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील लक्ष्मीदर्शन विरहित कॅफेंवर यशस्वी कारवाई करण्यात तोफखाना यंत्रणेला यश आले. मात्र लक्षीदर्शन कॅफेंवर यंत्रणेची करडी नजर फिकी होत आल्याचे समजते. गोल्ड स्टार,झेड के.अशा अनेक कॅफे चालकांकडून आर्थिकमसाले मिळत असल्याने मोहित याचे संपूर्ण सुरक्षा कवच या कॅफे चालकांना मिळत असल्याचे चित्र आहे.आता अधीक्षकांच्या नजरेतून हा मोहित “मिस्टर इंडिया” होतो कि “फस गये मोहित” होतो हे पाहणे गरजेचे आहे.