TIMES OF AHMEDNAGAR
भाग : २
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गुंडाराज सुरु आहे. या गुंडाराज्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहे. अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना दिली म्हणून वकिलावर जीवघेणा हल्ला होता,तर खंडणीसाठी वकिलाचा जीवच घेतला जातो.यापूर्वी अहमदनगर शहरात व जिल्ह्यात अशी परिस्थिती कधी पाहायला मिळाली नाही. वर्तमानकाळात गुंडांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. कारण प्रमुख हे नावालाच आहे त्यांचा कारभार हा एक कर्मचारी पाहत असल्याचे समजते.
स्त्रोत.सोशल मिडिया.
राहुरी येथील वकील पती पत्नी खुनानंतर अहमदनगर शहरासह जिल्ह्यात मोठ्या तणावाचे वातावरण आहे.वकील संघटनेच्या वतीने आंदोलने केली जात आहे. अनेक ठिकाणच्या न्यायालयात कामकाज ठप्प झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या प्रकरणावर पोलिसांची चुप्पी लक्ष वेधून घेत आहे. वकील पती पत्नीचा खून खंडणीच्या कारणावरून झाला असल्याचे आरोपींनी काबुल केले असले तरीही हा खूप खंडणीच्या कारणावरून झाला नसल्याचे काही तज्ञांनी खासगीत सांगितले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मग त्या खुनामागचे कारण काय आहे ? हे पोलिसांच्या यंत्रणेने तपासने गरजेचे आहे. मात्र पोलीस त्याला जास्त गांभीर्याने घेत नसल्याची नाराजी गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
“रविराज” लाडकं बाळ ?
अहमदनगर जिल्ह्याला गुन्हेगारीने चांगलेच झोडपून काढले आहे. मिनिटामिनिटाला गुन्हेगारीच्या बातम्या सर्वसामान्य जनतेच्या मनात भीतीचे वातावरण तयार करत आहे. मात्र कोणत्या आरोपीवर काय गुन्हा दाखल करायचा,कोणत्या आरोपीला काय मदत करायची,किंवा कोणत्या तक्रारदाराला कस आणि कोठे फसवायचं याचा आदेश मात्र “रविराजच्या” हुकुमशाहीने निघत असतो.रविराज मालक जरी नसला तरी तो मालकांचा चालक असल्याचे बोलले जाते.