बलात्कारातील आरोपी माजी.नगरसेवक आणि त्याच्या पंटरने पत्रकाराला केली जबर मारहाण…..
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | AHMEDNAGAR POLICE | ACCUSED IN RAPE ASSAULTED JOURNALIST INJURED | JOURNALIST ADMITTED TO HOSPITAL | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर शहरात रविवारी (१२ मे) रोजी मंगलगेट (कोठला) येथे दोन गटात हाणामारी झाली.या हाणामारीमध्ये दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना किरकोळ मारहाण झाली होती. त्या हाणामारीमध्ये सचिन जाधव नामक राजकीय व्यक्ती देखील सहभागी होता. या मारहाणीत सचिन जाधव याला मारहाण झाल्याची माहिती मिळताच शहरातील पत्रकारांनी आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली होती.
जखमी पत्रकार.
द्वेषभावनेतून पत्रकाराला मारहाण !
सचिन याला मारहाण झाल्याची माहिती मिळताच पत्रकार आपले कर्तव्य बजावण्यासाठी मैदानात उतरले,सचिन याला मारहाण झाली असल्यामुळे त्याला साईदीप या खासगी रुग्णालयात हलवले असल्याची माहिती मिळताच शहरातील पत्रकारांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी एका तरुण पत्रकाराने सचिनच्या तब्बेतीची विचारपूस करत पुढील बातमीसाठी तेथे चित्रीकरण (शुटींग) सुरु केले. जबर मारहाण झाल्याचे ढोंग करणाऱ्या सचिनचा खरा चेहरा समोर येऊ नये म्हणून सचिनने चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला विचारले कोण आहेस तू पत्रकाराने त्याला उत्तर दिले कि मी पत्रकार आहे पत्रकार शब्द ऐकताच सचिनने त्या पत्रकाराला लाथ मारली आणि पत्रकारांच्या आई-बहिणीवर शिवीगाळ सुरु केली असल्याचे पिडीत पत्रकाराने सांगितले.
स्त्रोत.सोशल मिडिया.
बलात्काराची बातमी प्रसारित केली म्हणून सचिनचा पत्रकारांवर राग ?
सचिन हा अधिकच्या उपचारासाठी साईदीप रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. चित्रीकरण (शुटींग) करणाऱ्या पत्रकाराला सचिनने ज्यावेळी लाथ मारली त्यावेळी त्या पत्रकाराला सचिन म्हणाला कि मागील वेळेला माझ्यावर ३७६ म्हणजे बलात्काराचा गुन्हा दाखल झाला त्यावेळी पत्रकारांनी माझ्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली होती. एका-एका पत्रकाराचा मी काटा काढणार आहे. असे म्हणाला त्यावेळी सचिनचे अवैध कारभार चालवणारे पंटरांनी पडदा लाऊन सचिनच्या इशाऱ्यावरून पत्रकाराला रुग्णालयात जबर मारहाण केली. यावेळी एका व्यक्तीने भर रुग्णालयात पत्रकाराला चाकूने धमकावले तर त्यातील एका इसमाने पत्रकाराच्या खिशातील पैसे आणि मोबाईल बळजबरीने काढून घेत त्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
घटस्पोट झालेल्या महेलीचा बलात्कार केल्याचा सचिनवर आरोप ?