Reading:अहमदनगरमध्ये कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करून ५० लाखांची रोकड लंपास करून दरोडेखोर फरार ; आरोपींना अटक न केल्यास रस्तारोका आमदार संग्राम जगताप यांचा इशारा.
अहमदनगरमध्ये कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करून ५० लाखांची रोकड लंपास करून दरोडेखोर फरार ; आरोपींना अटक न केल्यास रस्तारोका आमदार संग्राम जगताप यांचा इशारा.
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | KANDA VYAPARI BATAMI | MLA SANGRAM JAGTAP | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE, AHMEDNAGAR | SHIVAJIRAO KARDILE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर : येथील नेप्ती कांदा मार्केट समोर कांदा व्यापार्यावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. व्यापार्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या जवळील सुमारे ५० लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आडत आणि कांदा व्यापारी समीर सय्यद हे नेप्ती मार्केटकडे येत असताना बायपास रोडवर त्यांना काही दरोडेखोरांनी घेरले आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांच्याकडील ५० लाखांची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. या प्राणघातक हल्ल्यात व्यापारी समीर सय्यद गंभीर जखमी झाले आहेत.
(संग्रहित दृश्य.)
चोरट्यांचा तातडीने शोध घ्या.
व्यापाऱ्याला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेने अहमदनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी जखमी व्यापार्याची भेट घेतली आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेतला नाही तर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
(स्त्रोत.संग्राम जगताप सोशल मिडिया.)
आरोपींवर योग्य ती कारवाई करा अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, बाजार समिती परिसरात सातत्याने छोट्या मोठ्या घटना घडत असतात. याबाबत अनेक तक्रारी देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. आजही एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत सुदैवाने ते बचावले. मात्र त्यांच्याकडील मोठी रक्कम दरोडेखोरांनी पळवून नेली. या घटनेनंतर व्यापारी बांधव, मार्केट कमिटीचे पदाधिकारी एकत्र जमले आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत लवकरात लवकर तपास लागला नाही, घटनेतील आरोपींवर योग्य ती कारवाई झाली नाही तर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
(स्त्रोत. शिवाजीराव कर्डिले सोशल मिडिया.)
आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले म्हणाले की, शेतकऱ्याला बाजार समितीत रोख रक्कम द्यावी लागते. त्या शेतकऱ्याने सुमारे ५० ते ६० लाख रुपये बँकेमधून काढून आणले. नेप्ती बाजार समितीचा आज लिलाव असल्याने ते आज बाजार समितीत दाखल होत असताना चार-पाच हल्लेखोरांनी शेतकऱ्याला मारहाण केली. त्याच्यावर वार करून रक्कम घेऊन लंपास झाले. याबाबत आम्ही एसपींची भेट घेऊन तातडीने या प्रकरणाचा तपास लावावा आणि आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणार आहोत. शेतकऱ्याची गेलेली रक्कम परत मिळायला हवी, अशीही मागणी आम्ही करणार आहोत. या गोष्टीचा तपास लागला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.