श्रेया गेम झाला रे…. साहेबांचा मुदतीआधीच कार्यक्रम झाला रे….!
अजय देवगणच्या दृश्यम 2 चित्रपटामध्ये अक्षय खन्ना हा अजय देवगणच्या घरी जातो आणि चमेलीचे फुल घेऊन अजय देवगणच्या पत्नीला (श्रिया सरन) विचारतो घर मी किसी को बहोत स्ट्रेस है क्या,नही ये जास्मिन के फुल देखे इसलिये पुछा,मेरे घर मे भी है. स्ट्रेस घटानेके लिये डॉक्टर लोग रेकमेंड करते है ना.की जास्मिन के फुल लगाओ करके. त्यावर अजय देवगणची पत्नी (श्रिया सरन) उत्तर देते कि नही मेरे हसबंडने लगाये है. यावर अक्षय खन्ना तिला उत्तर देतांना म्हणतो आपके हसबंडने के सारी महेनत पे बहोत जल्द पाणी फिरणे वाला है.
तसेच अहमदनगर महानगर पालिकेच्या नगरसेवकांच्या बाबतीत देखील घडले असल्याचे समजते. ३१ डिसेंबरला महानगर पालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपणार होता. अहमदनगर महानगर पालिकेच्या स्थायी समितीची सभा क्र.११ गुरुवार दी.२८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १:०० वाजता अहमदनगर महानगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत येथील मा.स्थायी समिती सभागृह,अहमदनगर या कार्यालयात होणार होती.आज सभागृहात आपआपली कामे मार्गी लावण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांचे स्वप्न भंगले आहे.अन्वये राज्य निवडणूक आयोगानेप्रशासक नेमणूक करणेकामी निर्देशीत केले आहे. तसेच संदर्भिय क्र. २ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम,१९४९ प्रकरण २, ६-१ अन्वये अहमदनगर महानगरपालिकेची मुदत दिनांक २७/१२/२०२३ रोजी संपत आहे.तरी, मा. पदाधिकारी यांना यापुढील कालावधीत कुठल्याही प्रकारची सभा / बैठक घेता येणार नाही याची नोंद घ्यावी. अशा प्रकारचा उल्लेख असलेल्या पत्राने सध्या काही नेत्यांच्या नियोजित कार्यक्रमांचा कार्यक्रमच लावला आहे.
खासगीत रंगलेल्या चर्चेनुसार असे कळते की महानगर पालिकेच्या काही नगरसेवकांचा स्ट्रेस वाढला आहे.पाहुण्याला तीन दिवस अगोदरच निरोप मिळाल्याने पाहुणे सध्या शॉक झाले आहेत. अजय देवगणच्या दृश्यम 2 चित्रपटामध्ये दाखवलेल्या दृश्यासारखे या नगरसेवकांच्या घरात देखील जास्मिनची फुले लावण्याची गरज असल्याचे गमतीशीर जोक्स सध्या खासगी चर्चेतून ऐकायला मिळत आहेत.
या पत्रामुळे नगरसेवक शॉक.