महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शीतल जगताप याही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या आहेत. शीतल जगताप या शहर व उपनगरमधील विविध वसाहतींमध्ये महिलांच्या गाठीभेटी घेत आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकासकांची सविस्तर माहिती, तसेच राज्य सरकारच्या महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती शीतल जगताप महिलांना देत आहेत. शहरात त्यांच्या या छोट्या बैठकांना महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी शीतल जगताप म्हणाल्या, राज्यातील महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महिलांना केंद्रस्थानी ठेवत भरपूर योजना सुरु केला आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारख्या अनेक योजना या महिलांना आधार देणाऱ्या आहेत. नगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून या सर्व योजनांचा लाभ शहरातील महिलांना मिळत आहे. नगर शहराच्या सर्वांगीण विकासाठी आमदार संग्राम जगताप हे कायम प्रयत्नशील असल्याने त्यांना मोठे यश आले आहे. आज नगर शहरातील सर्व भागांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विकास कामे झाली आहेत. या माध्यमातून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न व समस्याही सुटल्याने आमदार संग्राम जगताप यांचे शहरातील नागरिकांशी ऋणानुबंध जुळत अतुट नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना या विधानसभा निवडणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त मोठा प्रतिसाद मिळत आहे.