By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: संगमनेरच्या मैदानात शिंदेंचा उमेदवार….विधानसभेतून टायगरचा पत्ता कट.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > संगमनेरच्या मैदानात शिंदेंचा उमेदवार….विधानसभेतून टायगरचा पत्ता कट.
अहमदनगर

संगमनेरच्या मैदानात शिंदेंचा उमेदवार….विधानसभेतून टायगरचा पत्ता कट.

Last updated: 2024/10/29 at 5:39 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे  बिगुल वाजले असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत सामना रंगणार आहे. तर गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेत आला होता. कारण या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता. मात्र ही जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली. शिवसेना शिंदे गटाने अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सुजय विखे पाटील यांचा निवडणुकीतून पत्ता कट झाला आहे. याबाबत सुजय विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Sujay Vikhe | सुजय विखे पाटलांची डिग्री बोगस?; 'त्या' व्हायरल व्हिडीओमुळे नगरमध्ये खळबळ - Marathi News(संग्रहित दृश्य.)

प्रस्थापितांना मॅनेज न होणारा उमेदवार.

सुजय विखे म्हणाले की, ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला होता. ही जागा अगदी शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली. नगर जिल्ह्यात कोणती जागा कोणाला जाईल, असे अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. महाराष्ट्रात ८ ते १० जागा शेवटच्या टप्प्यात उरल्या होत्या. या जागांबाबत वरच्या स्तरावर वाटाघाटी झाल्या. संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचं वैशिष्ट्य असे आहे की, मागच्या पाच वर्षात त्यांनी सर्वसामान्य जनतेचे अनेक कामे केली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रस्थापितांना मॅनेज न होणारा उमेदवार आम्ही तिथे दिला आहे. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा काय करून दाखवू शकतो, हे २३ तारखेला कळेल, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये सुजय विखे व्यासपीठावर असलेले वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर संगमनेरचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयानेही याबाबत दखल घेतली. राजकीय वर्तुळातही विरोधकांकडून याचा कडाडून विरोध करण्यात आला होता. यानंतर सुजय विखे यांचा पत्ता कट करत. शिवसेना शिंदे गटाला संगमनेरची जागा सुटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy1
Sleepy0
Angry0
Dead1
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात विरुद्ध अमोल खताळ, यंदा थोरातांचा पराभव निश्चित.
Next Article पुन्हा कार्यालयात धमकीचा दूरध्वनी, बाबा सिद्दिकीनंतर कोण ? झिशान सिद्दीकी व अभिनेता सलमान खान.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?