दीपावली, पाडवा आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या बुर्हाणनगर येथील निवासस्थानी असलेला फराळाचा कार्यक्रम हे समीकरण आता रूढ झाले आहे. यंदाही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्डिले यांच्या निवासस्थानी दिवसभर फराळासाठी विविध मान्यवरांसह मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने आवर्जून हजेरी लावत फराळाचा आस्वाद घेतला. कर्डिले परिवाराने सर्वांचे स्वागत करीत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
(संग्रहित दृश्य.)
कर्डिले यांच्या आजोबांनी साधूसंत आमची सेवा, अन्नदानाचे संस्कार.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या परिवाराला अध्यात्माची, सेवेची आवड आहे. कर्डिले यांच्या आजोबांनी साधूसंत आमची सेवा, अन्नदानाचे संस्कार रूजवले. तीच परंपरा शिवाजीराव कर्डिले हे पुढे चालवत आहेत. मागील ३० वर्षांपासून कर्डिले आपल्या निवासस्थानी मतदारसंघातील जनतेसाठी फराळाचे आयोजन करतात. प्रत्येकाचे आपुलकीने स्वागत करुन त्यांना मायेने दोन घास भरवले जातात. यावर्षी निवडणुक असुन स्वतः शिवाजीराव कर्डिले राहुरी मतदारसंघातून भाजपची उमेदवारी करीत आहेत. त्यामुळे यंदाच्या दीपावली फराळाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीचे दिवस असले तरी दिपावली पाडवा हा सण पारंपारिक उत्सव आणि स्नेह मेळावा असून दरवर्षी जिल्हाभरातून नागरिक प्रेमापोटी बुर्हाणनगर मध्ये येत असतात. कर्डिले यांच्या निवासस्थानी दररोज सकाळी होणारा जनता दरबार नागरिकांसाठी अनेक प्रश्न सोडवणारा असतो. आमदार नसले तरी कर्डिले आपल्या व्यथा ऐकून समस्यांवर तोडगा काढणार असा विश्वास जनतेत निर्माण झालेला आहे. याचे प्रत्यंतर दरवर्षी फराळाच्या कार्यक्रमात येते. माजी खासदार डॉ . सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार पांडुरंग अभंग, नाना दरेकर, विक्रम पाचपुते, डॉ . दीपक, विठ्ठलराव लंघे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर, रामदास आंधळे, संजय ढोणे, सतीश शिंदे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. येणाऱ्या पाहुण्यांचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, अक्षय कर्डिले, संदीप कर्डिले, देविदास कर्डिले यांनी स्वागत केले आहे.