By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: आर्थिक अडचणीचे कारण देत शिवराम आर्य उर्फ जमीर शेख संपूर्ण कुटुंबासह पुन्हा एकदा मुस्लिम धर्मात……
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > आर्थिक अडचणीचे कारण देत शिवराम आर्य उर्फ जमीर शेख संपूर्ण कुटुंबासह पुन्हा एकदा मुस्लिम धर्मात……
अहमदनगर

आर्थिक अडचणीचे कारण देत शिवराम आर्य उर्फ जमीर शेख संपूर्ण कुटुंबासह पुन्हा एकदा मुस्लिम धर्मात……

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | JAMIR SHAIKH, WHO LIVES IN AHMEDNAGAR CITY, CONVERTED TO HINDUISM WITH HIS FAMILY | AGAIN THEY ARE GOING TO CONVERT TO ISLAM WITH THEIR ENTIRE FAMILY ON THE DAY OF BAKRI EID CITING FINANCIAL DIFFICULTIES | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/12 at 7:27 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

छत्रपती संभाजीनगरमध्ये  गेल्या वर्षी बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री  यांच्या एका कार्यक्रमात अहमदनगर  शहरात राहणारे जमीर शेख  यांनी त्यांच्या कुटुंबासह हिंदू धर्मात प्रवेश केला होता. या धर्मांतरानंतर त्यांचे नाव बदलून शिवराम आर्य असे करण्यात आले होते मात्र आता माहितीनुसार, शिवराम आर्य पुन्हा एकदा मुस्लिम धर्मात प्रवेश करणार आहे. आर्थिक अडचणीचे कारण देत शिवराम आर्य संपूर्ण कुटुंबासह मुस्लिम धर्मात बकरी ईदच्या  दिवशी शहरातील मिर्झा लायब्ररी येथे सकाळी ११ वाजता प्रवेश करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून घरी हिंदू परंपरेप्रमाणे धार्मिक विधीकरत असल्याने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमात जमीर शेख यांनी त्यांच्या कुटुंबासह हिंदू धर्मात प्रवेश केला होता. यावेळी त्यांचा नाव बदलून शिवराम आर्य करण्यात आले होते तर पत्नी अंजुम शेखचे सीता आर्य आणि दोन मुलांना बलराम आणि कृष्णा असे करण्यात आले होते. मात्र आता शिवराम आर्य मुस्लिम धर्मात प्रवेश करणार आहे. शिवराम आर्य पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याचे पाठीमागचे कारण आर्थिक परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे. शिवराम आर्य यांना त्यांच्या आठ वर्षाची मुलगी अश्विनी हिची मेंदूची शस्त्रक्रिया करायची आहे. मात्र यासाठी हिंदू धर्मातील लोकांकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने ते पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याची तयारी करत आहे.

Jameer Shaikh Family Conversion To Hindu As Shivrama Arya In Presence of Dhirendra Shastri; मी कृष्णभक्त! जमीर शेख झाले शिवराम आर्य, धीरेंद्र शास्त्री बाबा यांच्या उपस्थितीत हिंदू ...स्त्रोत सोशल मिडिया 

संपूर्ण कुटुंबासह हिंदू धर्मात प्रवेश केला होता…

माहितीनुसार शिवराम आर्यची मुलगी अश्विनी हिच्या मेंदूत गाठ आहे. या शस्त्रक्रियेसाठी साडेचार लाख रुपये खर्च येणार आहे मात्र त्यांच्याकडे इतके पैसे नसल्याने ते पुन्हा एकदा मुस्लिम धर्मात प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे शिवराम आर्य यांच्याकडे काही कागदपत्र हिंदू नावाप्रमाणे तर काही कागदपत्र मुस्लिम नावाप्रमाणे असल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नसल्याची देखील माहिती समोर आली आहे. जमीर शेख हे मूळ जालना जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या ४० वर्षांपासून ते अहमदनगर शहरात राहत आहे. त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या एका कार्यक्रमात संपूर्ण कुटुंबासह हिंदू धर्मात प्रवेश केला होता. लोकांना नाव पुकारताना रामाच स्मरण व्हाव यासाठी त्यांनी शिवराम नाव धारण केले होते.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy1
Sleepy0
Angry0
Dead1
Wink1
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article आगामी आमदारकीला अनेक राजकीय गणिते बदलणार , कर्डिले यांनी घेतली मुंबईत जाऊन अजित पवारांची भेट….
Next Article मुस्लिमांचं लक्ष सानिया मिर्झाच्या स्कर्टवर, म्हणत मोदी आणि योगींवर देखील नसरुद्दिन शाहने परखड मत व्यक्त केले.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?