सध्या सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये दिवसाढवळ्या रस्त्यावर एक महिला विवस्त्र होऊन फिरत होती. रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरू असताना महिला रस्त्यावर फिरताना दिसत होती. हा व्हिडीओ मोहन नगर पोलीस स्टेशन साहिबाबाद भागातील आहे. बुधवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचे समजते. मोहन नगर चौक हा गाझियाबादचा सर्वात वर्दळीचा चौक आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीसीपी ट्रान्स हिंडन यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.

VIDEO: गाजियाबाद में बीच सड़क पर नग्न हो कर घुमती रही महिला, वीडियो वायरल होने के बाद जांच के आदेश | 🇮🇳 LatestLY हिन्दीस्त्रोत.सोशल मिडिया.

एक महिला कपड्यांशिवाय फिरत होती.

एक्सवर @hariomydvAu1000 नावाच्या खात्यावरून हा व्हायरल व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ गाझियाबादमधील असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. धक्कादायक व्हिडिओमध्ये गाझियाबादमधील मोहन नगर चौराहा येथील एका रहदारीच्या रस्त्यावर एक महिला कपड्यांशिवाय फिरताना दिसत आहे. कोणीही महिलेच्या वर्तणूकीवर आक्षेप घेताना दिसत नाही, तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा तिला कपडेही दिले नाही. जेव्हा ती रस्त्यावरून फिरत होती, तेव्हा त्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ आहे.

 

गाझियाबादमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी म्हणजे २५ जून रोजी शूट करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. ही महिला कोण आहे आणि ती रस्त्यावर का विवस्त्र अवस्थेत फिरत आहे हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.घटनेच्या दोन दिवसांनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हाच अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे. या घटनेमुळे राज्यातील विशेषत: गाझियाबादमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करणे आणि तिचा सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शक्य तितक्या लवकर महिलेचा शोध घेणे अत्यावश्यक ठरत आहे.