माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिराळ चिंचोडी येथे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डीले यांच्या प्रचारार्थ एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सुजय विखे यांनी जोरदार भाषण केले आहे. त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. तसेच महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावं. असं आवाहन केलं.
(संग्रहित दृश्य.)
लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत चांगलं वातावरण असताना नंतर…
लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नाही. असं सुजय विखे पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत चांगलं वातावरण असताना नंतर अचानक काय झालं माहिती नाही. माझा पराभव झाला. असं सुजय विखे म्हणाले. वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली. तसेच माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. संगमनेरमध्ये देखील आपल्या सभांना गर्दी पाहून सर्वांना वाटलं की मी आमदार होणार. तशी चर्चा सुरू झाली. मात्र वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली. असं सांगत सुजय विखेंनी संगमनेर येथील सभेदरम्यान झालेल्या सभेची आणि गोंधळाची आठवण काढत चांगली टोलेबाजी केली आहे. विखे यांच्या हा विधानानंतर सभेत चांगलाच हशा पिकला.