आतीकचे अवैध गुटखा विक्रीचे मोठे धंदे कारण त्याला पार्टनर आहे खात्यातला मिंधे. !
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | ILLEGAL ADMINISTRATION | BHINGAR POLICE STATION | ATIQ IS A GUTKA SELLER. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर जिल्ह्यासह शहरात अनेक अवैध कारभार सुरु आहेत. या अवैध कारभारामुळे शहरातील शांतता भंग झाली आहे. शहरातली शांतता आटोक्यात आणण्यासाठी पोलीस दलातील काही कर्मचारी परिश्रम घेत आहेत.खाल्लेल्या मिठाला जागत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांच्या ओठांना लक्ष्मीची लाळ लागली असल्याचे बोलले जात आहे. म्हणून पोलीस दलात देखील मिंधे जन्म घेत असल्याने खळबळ उडाली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
खात्यात देखील मिंधेचा जन्म !
महाराष्ट्रात रंगलेल्या राजकारणात शरद पवारांनी आपला डाव टाकत उद्धव ठाकरेंना सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. आणि उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळा टाकली होती. मात्र सत्तेत अजित पवार नकोचा नारा देणाऱ्यांनी देखील मग आपला डाव टाकत उद्धव ठाकरेंच्या गळ्यातली मुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात कशी येईल यासाठी धावपळ केली. आणि अखेर महाराष्ट्राचे राजकारण हे जनतेने पाहिले आता ते नव्याने सांगणे गरजेचे नाही.राजकारणात राजकारण असणे अपेक्षित आहे. मात्र पोलीस दलात राजकारण असणे हे अशोभनीय आहे. भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील सत्तेसाठी एका मिंधेचा मोठा वावर सुरु आहे.आपल्या गुरूला खुश करण्यासाठी हा मिंधे अवैध धंदे चालकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून आर्थिक मलाई जमा करत असून गुरुचे लाड पुरवत आहे. गुरुच्या नावावर चाललेल्या या तुफान फटकेबाजीमध्ये मिंधे पूर्ण मलाई खाऊन गुरूला चील्लरचा झणका देत गुरूची दिशाभूल करून आपली पोळी भाजून घेत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
धंदा मिंधेचा कि आतीकचा……
भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची जोरदार फटकेबाजी सुरु आहे. अवैध धंद्यांचे ठेके आणि अवैध धंदे चालक हे पोलिसांना माहित नसावे हे शक्यच नाही. मात्र पोलीस या धंदे चालकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही हे नवलच, भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे आणि ते अपयशी ठरावे हे देखील शक्य नाही. मात्र पोलीस या अवैध धंदे चालकांवर कोणतीही कारवाई करत नसल्याने पोलिसांनाच या कारभारांवर कारवाई करायची नसेल. जर मिंधे या आतिक नामक गुटखा सप्लायरचा पार्टनर असेल तर मग पोलीस कारवाई करू शकणार नाही कारण पोलिसांचे हाथ हे गुरूंच्या पुढे बांधलेले आहे अशी खंत स्थानिक पिडीत नागरिक करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.