महाराष्ट्रात अनेक प्रश्नांनी सर्वसामान्यांना वैतागून सोडले आहे. सर्वसामान्य जनतेच्या हाती फक्त निराशा असल्याचे सध्या एकंदरीत चित्र आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण,अमरावतीतील सूर्यवंशी प्रकरण,पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरण,अशा अनेक घटना सध्या महाराष्ट्रात घडलेल्या आपण पाहत आहोतच,मात्र सध्याच्या काळात अतिक्रमणांनी थैमान घातले आहे. अनधिकृत अतिक्रमनांवर कारवाया झाल्या पाहिजे,मात्र सर्वसामान्य जनतेला जाणूनबुजून त्रास देणे योग्य नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव संघटक (ओबीसी) विद्या गाडेकर यांनी आता बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
(उपोषण स्थळाचे छायाचित्र.)
जीवाचे बरे वाईट झाल्यास…..
शेवगाव तालुक्यातील खानापूर, नवीन दहिफळ, एरंडगाव,दहीगावने, बोडखे, कुंटेफळ व इतर पुनर्वासित गावात अनेक शासकीय जागेवर अतिक्रमण झाल्या कामी शासन सामान्य लोकांचे, शेतकऱ्यांचे मौल्यवान घरे पडण्याचे नोटीस नियोजन करत आहे.ते तात्काळ थांबवावे. शेवगाव शहरातील अतिक्रमित दुकाने शासनाने पाडले आहेत त्या अंदाजे ९०० लोकांचे व्यावसायिक पुनर्वसन शासनाने तात्काळ करावेया करता शासनाच्या धोरण विरोधात प्राणांतिक उपोषण करत आहोत. सदर उपोषण काळात माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील नोंद घ्यावी असे निवेदन विद्या गाडेकर यांनी शेवगाव तहसीलदार यांना दिले आहे.
(उपोषण ठिकाणचे छायाचित्र.)
विद्या गाडेकर भूमिकेवर ठाम….?
विद्या गाडेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी अनेकदा आंदोलने व उपोषण केली आहेत. विद्या गाडेकर उपोषण करत असतांना गावकऱ्यांनी त्यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे. उपोषणा दरम्यान गाडेकर यांची प्रकृती खालावली असल्याचे समजते. विद्या गाडेकर या उपोषण करत असतांना रात्री त्यांना उपोषणाच्या ठिकाणी मुक्काम करावा लागत आहे. त्यामुळे विद्या गाडेकर यांची गावकऱ्यांनी मोठी काळजी असल्यामुळे गावकऱ्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती गाडेकर यांना केली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.