इलेक्टोरल बाँड्सच्या तपशीलासोबत नंबरही उघड करा. – सर्वोच्च न्यायालय.
TIMES OF AHMEDNAGAR | SUPREME COURT | DELHI | CHIEF JUSTICE DY CHANDRACHUD | STATE BANK OF INDIA | ELECTROL BOND | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
आज सर्वोच्च न्यायालयामध्ये इलेक्टोरल बाँड्स संबंधी सुनावणी सुरू आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआयला) इलेक्टोरल बाँड्सचे नंबरही उघड करण्याबाबत निर्देश दिले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने आतापर्यंत बाँड्सची खरेदी कोणी केली, आणि कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली याची माहिती दिली आहे. मात्र कोणी कोणत्या पक्षाला रक्कम दिली हे आतापर्यंत समोर आलं नव्हतं. बाँड्सचे नंबर उघड केल्यानंतर ही माहिती देखील समोर येण्याची शक्यता आहे.