सामाजिक कार्यकर्ते हर्षल आगळे यांच्या आजी ताराबाई मनोहर कौसे यांचे दुःखद निधन.
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | SAD DEATH OF TARABAI MANOHAR KAUSE | DASAKRIYA RITUAL WILL BE HELD ON 26 JUNE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – ताराबाई मनोहर कौसे यांचे सोमवार दि. १७ जून २०२४ रोजी दुःखद निधन झाले असून त्या ८५ वर्षांच्या होत्या. मोहोज देवढे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक एकनाथ कौसे व सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक जगन्नाथ कौसे यांच्या त्या आई होत्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते हर्षल आगळे याच्या त्या आजी होत्या.
स्त्रोत सोशल मिडिया
दशक्रिया विधी…
ताराबाई कौसे दशक्रिया विधी बुधवार दि. २६ जून २०२४ रोजी सकाळी ८ वा. मोहोज देवढे ता. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथे होणार आहे. यावेळी ह.भ.प. राऊत दादा महाराज यांचे प्रवचन होणार आहेत. त्यांच्या पश्चात ६ मुली, २ मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै. ताराबाई मनोहर कौसे या अत्यंत मनमिळावू, प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.