जामखेडमध्ये भीषण अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी, कार मधील सर्व नगरमधील एमआयडीसी परिसरातील….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | JAMKHED | TERRIBLE ACCIDENT INVOLVING CAR AND ST BUS IN JAMKHED | THREE PEOPLE ARE DEAD AND TWO ARE SERIOUSLY INJURED | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
![](https://timesofahmednagar.com/wp-content/uploads/2024/06/Untitled-design_20240610_161126_0000-1068x601-4-860x484.png)
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड पोलीस ठाणे हद्दीतील जामखेड खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात, कोल्हे पेट्रोल पंप जवळ जामखेडकडून खर्डाकडे जाणारी कोपरगाव आगाराची कोपरगाव ते हैदराबाद जाणारी एसटी बस क्रमांक एम एच ०९ एफ एल १०२७ हे (चालक सचिन विष्णू राऊत, वय ३८ बॅच न ८५५१) या बसचा आणि खर्डा कडून जामखेड कडे येणारी शेरोलेट बीट कार क्रमांक एम एच १६ ए टी ६४९२ या वाहनांचा भिषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भिषण होता की .या अपघात कार मधील पाच जणांपैकी दोन जण जागीच ठार तर एकाचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.
या अपघातातील सर्व तरूण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता, एम आय डी सी, नगर येथील रहिवासी आहेत. जखमींवर समर्थ हॉस्पिटल जामखेड येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. सदर अपघातील बसचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
EDITOR IN CHIEF
TIMES OF AHMEDNAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment