मीरा रोड येथील फातिमा खातून या ३१ वर्षीय महिलेने ६ जून रोजी कोल्हापूर-मुंबई-महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये एका चिमुकलीला जन्म दिला. कोल्हापूर-मुंबई-महालक्ष्मी एक्स्प्रेसने लोणावळा स्थानक ओलांडल्यानंतर या महिलेची रेल्वेतच प्रसुती झाली. त्यामुळे या महिलेच्या पतीने त्या मुलीचे नाव ट्रेनच्या नावावरून महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला.तिरुपती ते कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरापर्यंत प्रवास करणाऱ्या तय्यब (फातिमा खातुनचे पती) यांनी सांगितलं की, माझ्या मुलीचा या ट्रेनमध्ये जन्म होणं म्हणजे देवीचे दर्शन घेण्यासारखे आहे. म्हणून मी तिचे नाव महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) या महिलेला आणि तिच्या नवजात बाळाला तत्काळ वैद्यकीय मदत पुरवली. पोलिसांच्या या तत्परतेचंही तय्यब यांनी कौतुक केलं आहे.

जन्म - विकिपीडिया(संग्रहित.स्त्रोत.सोशल मिडिया.)

फातिमा खातून आणि तय्यब या जोडप्याला आधीच तीन मुले आहेत. फातिमाची प्रसुती तारीख २० जून असल्याने कुटुंबाने कोल्हापूर ते मुंबई असा रेल्वे प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत तय्यब म्हणाले, इंजिन बिघडल्यामुळे ट्रेन दोन तासांपेक्षा जास्त वेळ लोणावळा येथे थांबली. रात्री ११ च्या सुमारास ती पुन्हा सुरू झाली. तेव्हा माझ्या पत्नीच्या पोटात दुखू लागले त्यामुळे ती शौचालयात गेली. परंतु बराचवेळ झाला तरी ती परत न आल्याने मी तिला पाहायला गेलो. तिथे जाऊन पाहतो तर तिची प्रसुती झाली होती. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अनेक महिला प्रवासी मदतीला पुढे आल्या होत्या.

Civil Hospital,परिचारिका, तंत्रज्ञांहाती केरसुण्या! - nurses, technicians!  - Maharashtra Times(संग्रहित.स्त्रोत.सोशल मिडिया.)

परिचारिका आणि कर्मचारी स्टेशनवर पोहोचले.

ट्रेनमधील एका जीआरपी कॉन्स्टेबलने तय्यबला जीआरपी हेल्पलाइनवर कॉल करून परिस्थितीची माहिती देण्यास सांगितले. गाडी कर्जत स्टेशनवर आल्यावर कुटुंब गाडीतून उतरले. कर्जत जीआरपीचे एपीआय मुकेश ढेंगे म्हणाले,आम्ही कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला सूचित केले आणि परिचारिका शिवांगी साळुंके आणि कर्मचारी स्टेशनवर पोहोचले. महिला आणि बाळाला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. तीन दिवसांच्या उपचारानंतर आई आणि बाळाला घरी सोडण्यात आल्याचे हॉस्पिटलच्या सहाय्यक मॅट्रन पाटील यांनी सांगितले.