TIMES OF AHMEDNAGAR
भाग – ०६
अहमदनगर – शहरात गुटखा विक्री,अवैध दारूंची विक्री, वेश्या व्यवसाय, मटका, जुगार,बिंगो अशा अवैध धंद्यांनी धुमाकूळ मजवाला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याची हद्द हि अवैध धंद्यांचे साम्राज्य असल्याचे बोलले जाते. कोतवाली हद्दीत जिल्हा क्रीडा संकुल ( वाडिया पार्क ) आहे. क्रीडाप्रेमी हे निरोगी राहण्यासाठी नियमितपणे व्यायामासाठी वाडियापार्क येथे येते असतात. तर युवा खेळाडूंची देखील गर्दी वाडियापार्क येथे असते. या वाडिया पार्कच्या समोर एक भाई सर्रासपणे जुगाराचा मोठा खेळ चालवत आहे. याची माहिती पोलिसांना असतांना देखील पोलीस त्या भाईवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. तसेच कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अवैध गुटखा विक्री केली जाते.तर कोतवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे अनेक भोंगळे कारभार सुरु आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
पोलिसांची कारवाई का नाही. ?
गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची कोणतीही उपयायोजन अस्तित्वात नाही. अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना गुप्तदाराकडून प्राप्त होते. मात्र नेत्यांच्या आदेशावर कोतवालीची कारवाई सुरु असल्याचे समजते. नेते लक्ष्मी दर्शन घेऊन अवैध धंद्यांना आशीर्वाद देत आहेत.तानाशाही सुरु असलेल्या हद्दीत नागरिक सुरक्षित नसल्याचे बोलले जाते. केडगाव येथील आरती हॉटेलमध्ये हुक्का पार्लर जोरात सुरु असल्याचे माहिती एका गुप्तदाराने पोलीस अधीक्षकांना दिली होती. यावेळी पोलीस अधीक्षकांनी ताबडतोब दखल घेत भररात्री संबंधित हॉटेलवर छापा टाकला होता. अधीक्षकांच्या कारवाईची कोणतीही माहिती कोतवाली पोलिसांना नव्हती अधीक्षकांनी कारवाई केल्यानंतर संबंधित यंत्रणा घटना स्थळी पोहचली होती. आरती हॉटेलवर कोणाचा मुक्काम असतो तिथे चालणाऱ्या अवैध धंद्यांना कोण खतपाणी घालत आहे हा देखील महत्वाचा मुद्धा उपस्थित होत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
यादवांच्या राज्यात नेते गायब होते. !
काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर यादव हे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक होते. यादव हे नागरिकांच्या सेवेत अहोरात्र तैनात होते.यादवांच्या काळात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर बेधडक कारवाई केली जात होती. यादवांच्या काळात कामचोर कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला जात होता. आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांना यादव यांनी अत्यंत जबाबदारीने लांब ठेवले होते. यादवांच्या काळात आरोप असलेले कर्मचारी व शिक्षा असलेले कर्मचारी हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील फिरत नव्हते. यादवांच्या काळात कोणतेही शासकीय काम न करता मानधन घेणारे कर्मचारी देखील प्रशासनात आढळून आले होते. काही दिवसांपूर्वी यादव यांची बदली झाली. आणि कोतवाली पोलीस ठाण्याला नूतन निरीक्षक म्हणून प्रताप दराडे यांची नियुक्ती करण्यात आली.