TIMES OF NAGAR
पुणे : पुण्यातील तरुणीला झिपलाईनिंग हा साहसी खेळ खेळणं चांगलंच भोवलं आहे. झिपलायनिंग करताना ३० फूट उंची वरून कोसळून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडली आहे. तरल अटपाळकर अस मृत्यू झालेल्या २८ वर्षीय तरुणीचं नाव आहे. या प्रकरणातून वॉटरपार्कच्या मालकासह चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली हेाती. कुटुंबासोबत राजगड वॉटरपार्कमध्ये साहसी खेळ आणि मौज करण्यासाठी गेलेल्या तरुणीला झिप लाईन हा खेळ जीवावर बेतलाय. पुण्यातील भोर तालुक्यात ही घटना घडलीय. झिपलाईन करण्यासाठी तरुणी ३० फूट उंचीवर गेली. यात रोपवरून चालत असताना तिने सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंगला अडकवण्याचा प्रयत्न केला. पण ् आणि ती थेट ३० फूट उंचीवरून खाली पडली. यात तरुणीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता वॉटरपार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच वॉटरपार्कचा निष्काळजी पणादेखील समोर आला आहे. यानंतर तिला तात्काळ नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पंरतु, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. कुटुंबाच्या डोळ्यादेखत तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.