दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेत क्षणार्धात धूम ठोकली.अन त्या बालकावर हल्ला चढवला.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | LEOPARD ATTACK | A CHILD DIED IN A LEOPARD ATTACK | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर- अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेल्याने मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेने गावावर शोककळा पसरली असून हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने वनविभागाविषयी संताप व्यक्त होत आहे.
(संग्रहित दृश्य.)
रक्तभंबाळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला.
श्रीरामपूर – राहाता सीमेवरील चितळी येथे मयूर दत्तात्रय वाघ यांची गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वस्ती आहे. वाकडी रोड काकडाई मंदिरा जवळ हि वस्ती आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रथमेश मयूर वाघ अंगणात खेळत होता. प्रथमेश मयूर वाघ या बालकावर घरा शेजारी असलेल्या डाळिंबाच्या बागेतून बिबट्या दबा धरून बसलेला होता. दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेत क्षणार्धात धूम ठोकली. बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व मंडळी बिबट्याच्या दिशेने धावले. मात्र बिबट्या मिळून न आल्याने त्यांनी डाळिंब व मक्याच्या शेतात शोध घेतला. नंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिनी गवतात रक्तभंबाळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला. त्याच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखमा होऊन जागेवरच गतप्राण झाल्याचे प्रथम दर्शनी नागरिकांनी यावेळी सांगितले. यावेळी त्याला तातडीने पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी प्रथमेशला मृत घोषित केले.