अहिल्यानगर : जिल्ह्यातील शिर्डी येथील १६ अवैध व्यावसायिकांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीकडून २ लाख ०२,३६० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दि ६ मे २०२५ रोजी शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू विक्रेते व अवैध जुगार चालविणाऱ्या इसमांची माहिती काढुन पंचासमक्ष १६ वेगवेगळया ठिकाणी छापे टाकुन अवैध व्यावसायिकांविरूध्द कारवाई केली. त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगारबंदी कायदयान्वये ७ व महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये ९ असे एकुण १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात २,०२,३६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, श्री. शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी, स्थानिक गुन्हे शाखा पोनि. श्री दिनेश आहेर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विशाल तनपुरे, रणजीत जाधव, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ यांनी केलेली आहे.