By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: जमावाने थेट पोलीस ठाणेच जाळून टाकल, १५० पोलिसांसह २५० जण जखमी, हल्लेखोर दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश जारी.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > देश-विदेश > जमावाने थेट पोलीस ठाणेच जाळून टाकल, १५० पोलिसांसह २५० जण जखमी, हल्लेखोर दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश जारी.
देश-विदेश

जमावाने थेट पोलीस ठाणेच जाळून टाकल, १५० पोलिसांसह २५० जण जखमी, हल्लेखोर दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश जारी.

TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | UTTARAKHAND | MOB ATTACK ON POLICE 250 INJURED INCLUDING 150 POLICEMEN ORDERS ISSUED TO SHOOT ASSAILANTS ON SIGHT |THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.|

Last updated: 2024/02/09 at 4:42 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

जमावाने हल्ला केल्यानंतर सर्वप्रथम शासकीय अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला. त्यापाठोपाठ पोलिसांनी महापालिका अधिकाऱ्यांना तिथून बाहेर काढलं. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. तसेच जमाव नियंत्रणात येत नाही हे लक्षात आल्यावर अधिक पोलीस कुमक मागवण्यात आली. आतापर्यंत या दंगलीत पिता-पुत्रासह सहा जणांचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी पत्रकार आणि सामान्य नागरिक जखमी झाले आहेत.

Uttarakhand Violence

पोलीस ठाणं पेटवलं

पोलिसांनी बनभुलपुरा भागात संचारबंदी लागू केली आहे. या भागात अधिक पोलीस कुमक बोलावण्यात आली आहे. तरीदेखील काही ठिकाणी हिंसाचार चालू आहे. दरम्यान दगडफेकीच्या घटनेत शहर दंडाधिकारी ऋचा सिंह रामनगरच्या कोतवालांसह २५० हून अधिक पोलीस शासकीय अधिकारी आणि पत्रकार जखमी झाले आहेत. समाजकंटकांनी बनभुलपुरा पोलीस ठाण्याला आग लावली आहे. दंगलखोरांनी पोलिसांची वाहनं, जेसीबी आणि अग्निशमन दलाची वाहनंदेखील पेटवली आहेत. आतापर्यंत या दंगलीत ६० हून अधिक वाहनं जाळली गेली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या लाठीचार्ज केला हवेत गोळीबार केला तरीदेखील ही दंगल थांबलेली नाही.

uttarakhand dhami government declared curfew in haldwani uproar | उत्तराखंड में बवाल के बाद लगा कर्फ्यू, उपद्रवियों को गोली मारने का आदेश | Patrika Newsस्त्रोत.सोशल मिडिया.

जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याचवेळी शेकडो लोकांनी घरांच्या छतावरून पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना ही दंगल नियंत्रणात आणता आली नाही. पोलीस वसतीमध्ये येऊ नयेत यासाठी प्रत्येक गल्लीच्या तोंडावर जमावाने टायर्स जाळले. तसेच काही पेटते टायर्स पोलिसांच्या दिशेने भिरकावले. तसेच जमवाने बनभुलपुरा पोलीस ठाणंदेखील पेटवलं आहे.

Haldwani Violence: हल्द्वानी हिंसा को लेकर यूपी में हाई अलर्ट, उत्तराखंड बॉर्डर पर बढ़ाई गई चेकिंग, सोशल मीडिया पर पुलिस की नजर - Haldwani Violence High alert in ...स्त्रोत.सोशल मिडिया.

गोळ्या घालण्याचे आदेश.

उत्तराखंडमधील हलद्वानी जिल्ह्यातील बनभुलपुरा भागात मलिक बागेजवळ एका अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांवर, पोलिसांवर आणि या घटनेचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी (८ फेब्रुवारी) रात्री घडली. दरम्यान पोलीस बंदोबस्तात अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आला. त्यानंतर जमाव आणखी आक्रमक झाला. या जमावाने पोलीस, महापालिका आणि प्रसारमाध्यमांच्या गाड्या पेटवल्या. जमावाकडून दगडफेक सुरू असताना त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अ्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तरीदेखील जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ सुरूच होती. अखेर पोलिसांना अधिक बळाचा वापर करावा लागला. परंतु तोपर्यंत बनभुलपुरा भागात मोठा हिंसाचार उसळला. या घटनेला २० तास उलटले तरी बनभुलपुरा भागात हिंसाचार चालू आहे. अशातच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

Communal tension grips Uttarakhand town after 'offensive' FB post on Kedarnath | Latest News India - Hindustan Timesस्त्रोत.सोशल मिडिया.

काय आहे प्रकरण ? 

बनभुलपुरा पोलीस ठाण्याजवळील मलिक बागेजवळ एक अनधिकृत मदरसा बांधण्यात आला होता. या परिसरात गुरुवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी नमाज पठणाच्या वेळी नेहमीपेक्षा अधिक लोक जमले होते. तसेच परिसरात गोंधळ सुरू होता. दरम्यान महापालिकेचं पथक जेसीबी घेऊन हा मदरसा पाडण्यासाठी मलिक बागेजवळ दाखल झालं. या जमावाला आधीच माहिती मिळाली होती की पालिका हा मदरसा पाडणार आहे. पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस मलिक बागेजवल पोहोचताच समाजकंटकांनी महापालिकेचे अधिकारी व  पोलीस आणि पत्रकारांवर दगडफेक सुरू केली. पाठोपाठ या जमावाने सरकारी वाहनं पेटवण्यास सुरुवात केली. रात्रीपासूनच या भागात मोठी दंगल उसळली आहे. त्यामुळे देवभूमी अशांत आहे.

uttarakhand: Uttarakhand paper leak case: Protest by youths in Dehradun turns violent; students lathi-charged - The Economic Times Video | ET Now

You Might Also Like

एअर इंडियाचं लंडनला जाणारं एआय १७१ हे विमान कोसळलं ; विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण मुलगा वाचला आई ढसाढसा रडत म्हणाली…..

चक्क दात घासण्याच्या ब्रशमुळे पतीचं लफडं उघड ; दर शुक्रवारी प्रेयसी घरी घेऊन…

चार विवाहित मुलांची आई सुनांचे दागिने घेऊन ३० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार…..

….तर बलात्काराचा खटला करता येणार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. !

मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूर शिकवले जाणार मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा ; यापूर्वी हिंदू महाकाव्ये, महाभारत आणि रामायण शिकवण्याची केली होती मागणी…….

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love2
Sad2
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अहमदनगर शहरासह जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी,जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या या सूचना …..
Next Article गृहमंत्री देवेंद्र फडणविसांनी माझा गेम करण्याचे आदेश दिले होते. त्या आमदाराच्या वक्तव्याने महाराष्ट्रात खळबळ. आमदार म्हणाले …..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?