प्रेमात अडसर नको म्हणुन आईने प्रियकराच्या मदतीने चार वर्षाच्या मुलाचा खुन करून मुलाचा मृतदेह २० डिसेंबर रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातील गोदावरी नदीपात्रात फेकून दिल्याची घटना घडली होती. या घटनेतील दोन्ही आरोपींना कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे. चासनळी शिवारातातील नदीपात्रात चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह एका गठोड्यात बांधलेल्या अवस्थेत शुक्रवार (दि. २० डिसेंबर २०२४) रोजी आढळून आला होता. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले, मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील तपासाची सूत्रे फिरवली व वैद्यकीय अहवालात मुलाचा मृत्यू डोक्याला जोराचा मार लागून झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा गांभीर्याने तपास करत असताना सिसिटीव्हीचे संकलनात एका मोटारसायकल वरून एक महिला आणि पुरुष हे गठोडं नेताना व परत येताना गठोडं नसल्याचे दिसून आले.
सदर आरोपीचा शोध सुरु असताना दिंडोरी पोलीस स्टेशनला कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वय ४ वर्ष दिंडोरी, शितल ज्ञानेश्वर बदादे, वय २५ साकोरी मिग ता. निफाड हे मिसिंग असल्याची तक्रार ज्ञानेश्वर बदादे यांनी केली होती. यावरून मृतदेह हे कार्तिक ज्ञानेश्वर बदादे ४ वर्ष असल्याची ओळख पटली. तपासाला वेग आला. सदरचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ज्ञानेश्वर बदादे आले असता त्यांनी बायको शितल ज्ञानेश्वर बदादे हिच्या विषयी माहिती दिली. सदरची महिला ही आज दिंडोरी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पथक तयार करून आरोपी शितल बदादे हिला दिंडोरी येथून ताब्यात घेतले. तसेच तिच्या प्रियकराविषयी माहिती घेऊन प्रियकर आरोपी सागर शिवाजी वाघ रा. बोर्हाळे ता. चांदवड यास सापळा रचून शिताफिने अटक केली.पुढील तपास पोलीस करत आहेत.