TIMES OF AHMEDNAGAR
हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या भाजपाच्या महिला उमेदवार माधवी लता यांनी मुस्लिम महिला मतदारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भातील एक व्हीडिओ समोर आला आहे. एका मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी तपासणी केली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
“बुरखा वर करा”
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माधवी लता बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलांना पडताळणीसाठी त्यांचा चेहऱ्यावरील बुरखा काढून टाकण्यास सांगत होत्या. बुरखा वर करा अस माधवी लता महिलांना म्हणत असल्याच व्हिडीओतून ऐकू येत आहे. माधवी लता त्यांची मतदार ओळखपत्रे तपासत असताना त्यांच्या बुरख्याकडे हातवारे करत होत्या. तसंच, तुम्ही हे मतदार कार्ड किती वर्षांपूर्वी बनवले आहे ? असा प्रश्नही त्यांनी केला त्या मुस्लीम महिलांना केला आहे.मतदार कार्ड तपासून झाल्यानंतर त्यांनी महिला मतदारांचे आधार कार्डही तपासले आहे. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रियाही दिली. त्या म्हणाल्या, मी एक उमेदवार आहे. कायद्यानुसार उमेदवाराला फेस मास्कशिवाय ओळखपत्र तपासण्याचा अधिकार आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
लताविरुद्ध मलकपेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.