पोलिसांनी आम्हाला पैशांची ऑफर दिली, घाईघाईने अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न; कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात पीडितेच्या पालकांच्या आरोपाने खळबळ.
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | KOLKATA RAPE-MURDER CASE | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला गेला. देशभरात आंदोलने करण्यात आली. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून तो तुरुंगात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. आता या प्रकरणात मृत पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. कोलकाता घटनेतील पीडितेच्या आई-वडिलांनी म्हटलं की, कोलकाता पोलिसांनी पीडितेच्या मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनी आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर पिडीतेच्या आई-वडिलांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
(संग्रहित दृश्य.)
पोलिसांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.
पीडितेच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप करताना म्हटलंय कि पोलिसांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. आम्हाला मृतदेह पाहण्याची परवानगी नव्हती आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेईपर्यंत आम्हाला पोलीस ठाण्यात थांबावं लागलं होतं. मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात आला, त्यावेळी आम्हाला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पैशांची ऑफर दिली होती, पण आम्ही लगेच नाकारली. कोलकाता येथील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर अद्यापही अनेक ठिकाणी निदर्शने सुरूच आहेत. बुधवारीही हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. आपल्या मुलीच्या न्यायासाठी लढणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे पालकही या आंदोलनात सहभागी झाले होते.
(संग्रहित दृश्य.)
तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या.
कोलकाता येथील आर.जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला गेला. या घटनेवरुन देशभरातील डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली. यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.
(संग्रहित दृश्य.)
रुग्णालयातील काही डॉक्टर या गुन्ह्यात सहभागी असू शकतात.
पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या. दुसऱ्या बाजूला या घटनेचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसतशी नवीन व धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी सीबीआयला (केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो या घटनेचा तपास करत आहे) सांगितलं की, रुग्णालयातील काही डॉक्टर या गुन्ह्यात सहभागी असू शकतात. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंततर सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.