TIMES OF AHMEDNAGAR
भाग – ०१ शहराचे कलेक्टर नेते.
अहमदनगर शहरात मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांमुळे दहशत पसरली आहे. मात्र पोलिसांचे डोके उशीवर असल्याने पोलीस आरामात व्यस्त असल्याची टीका नागरिकांकडून केली जाते. अवैध धंद्यांना पोलिसांचा चपराक राहिलेला नाही. मागील काही दिवसांपूर्वी कोतवाली हद्दीत गुन्ह्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.त्यातील जास्त प्रमाणातील घटना या अवैध धंद्यामुळेच घडत आल्याच्या नोंदी आहेत.
कोतवाली पोलिसांच्या कार्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतात. मात्र काही पोलिसांनी “हम नाही सुधरेंगे ” या गाण्याला अंगीकार करून घेतले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी यांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केली असल्याची तक्रार संबंधित कार्यकर्त्याने अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती.


