TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर शहरात नागरिक अनेक बेकायदेशीर कृत्यांच्या दबावाखाली जगत आहेत. वारंवार खून , दरोडे , ताबे , अवैध धंद्यांच्या बेकायदेशीर दुर्गंदित नगरकरांचा श्वास गुदमरत आहे. शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी मात्र प्रशासनाच्या दनगट भूमिकेला पोलिओ झाला असल्याचे बोलले जाते. मात्र हि परिस्थिती फक्त शहरापूर्ती मर्यादित नसून या अवैध धंद्यांचा सुळसुळाट एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
किच्चोरराज
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याने नवीन उद्योग धंदे अहमदनगरच्या धरतीवर येण्यास तयार नसल्याने शहरातल्या तरुणांना रोजगार मिळत नाही. राजकीय दबावामुळे अनेक मोठ्या कंपन्यांना आपला मोर्चा दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये वळवावा लागला असा आरोप अनेक राजकीय नेते मंडळी एकमेकांवर चिखल फेक करत असतांना आरोप करत असतात. मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) हद्दीत जर एखादी कंपनी किंवा एखादा मोठा उद्योग धंदा सुरु करायचा असल्यास किच्चोरराजा ची परवानगी घ्यावी लागत असल्याचे बोलले जाते. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे जोरात आहेत.या धंद्यांना किच्चोरराजा चा आशीर्वाद असल्याचे समजते. वेश्या व्यवसायांमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक वाद विवाद होत आहेत.
स्त्रोत. सोशल मिडिया.
महिलांवरचे अत्याचार ….. आता तर पुरुषाचाच बळी …..
शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी २०२४ संदीप शेळके या इसमाला आरोपींनी अनैर्सिंक संभोग करण्याचे उद्देशाने जास्त दारु पाजुन एमआयडीसी येथील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या पडक्या इमारतीत नेवुन मयत संदीप शेळके याचे कपडे काढण्याचा जोरजबरदस्तीने प्रयत्न केला.मात्र संदीपने आरोपींच्या या कृत्याला विरोध केला. संदीपने विरोध करताच आरोपींनी जवळ असलेल्या नायलॉन पट्टीने संदीपचा गळा आवळुन व दगडाने डोके व चेहरा ठेचुन त्याला जिवे ठार मारले.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १६९/२०२४ भा.द.वि. ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किच्चोरराजा यांच्या आशीर्वादाने वेश्या व्यवसाय जोरदार सुरु आहे , यामध्ये महिलांवरील अत्याचार पहाता महिला सुरक्षित नसल्याने बोलले जात होते. मात्र आता पुरुषांसादर्भात घडलेल्या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.
स्त्रोत. सोशल मिडिया.
किच्चोरराजाच्या आशीर्वादाने वेश्यांचा उगम, किच्च्चोरराजाला पाहिजे धन….
एमआयडीसी हद्दीत बनावट दारू विक्री, दरोडे , परप्रांतीयांची लुटमार असा कारभार सुरूच आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचा कानडोळा आहेच हे नव्याने सांगणे आवश्यक नाही. मात्र एमआयडीसी हद्दीत वेश्याव्यवसाय देखील जोरात सुरु आहे.कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना फूस लाऊन त्याच्या परप्रांतीय असण्याचा फायदा घेऊन त्या मजुरांना वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर नेले जाते. आम्ही खोटा गुन्हा दाखल करू म्हणून परप्रांतीय इसमांना ब्लॅकमेलिंग करून त्यांना लुटले जाते. या सर्व प्रकाराला तन,मन अर्पण करून किच्चोरराजा धन प्राप्त करत असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.