वाहनचालक लक्ष्मी दर्शन देऊन झाले जाम, हा म्हणतोय “पे” करा “दाम” आणि करा शहरातला चक्का जाम.?
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | MAHARASHTRA POLICE | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR POLICE | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE, AHMEDNAGAR | TRAFFIC CONTROL BRANCH | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर शहरात बेधुंध कारभार सुरु आहे. गुन्हेगारीचे प्रमाण देवसेंदिवस वाढतच आहे. मात्र या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मात्र प्रशासनाचे बळ कमी पडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ज्या पोलीस दलाकडून जनतेला अपेक्षा आहे त्या पोलीस दलातील काही लालचबहाद्दूर वसुली करून पोलीस दलाची अब्रू चव्हाट्यावर आणत असल्याने नागरिकांना त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
स्त्रोत.सोशल मिडीया.
वाहतूक नियंत्रण शाखा वसुलीत मग्न.
शहरात रहदारीचा प्रश्न उद्भवू नये याकरिता अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. पुणेवरून नगर मार्गी संभाजीनगर (औरंगाबाद) कडे जाणाऱ्या अवजड वाहनांना शहरातून जावे लागत होते. या वाहनांमुळे शहरात रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण होत होता. काही ठिकाणी या अवजड वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. याच अवजड वाहनाने शहरात प्रवेश करून भर वेगाने जात असतांना एका शाळकरी मुलाला डीएसपी चौकात धडक दिली होती या अपघातात या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता.
स्त्रोत.सोशल मिडीया.
आपलं एकच काम “पे” करा “दाम”
अवजड वाहने केडगाव बायपास ओलांडून केडगाव मार्गी शहरात दाखल होतात. या बसपासला वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी तैनात आहेत. मात्र हे वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी अवजड वाहन चालकांकडून रक्कम वसूल करून त्यांना शहरात प्रवेश देत आहे. ज्या वाहन चालकांकडून लक्ष्मी दर्शन होत नाही त्या अवजड वाहन चालकांना शहरात प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मात्र त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ माहिती असून देखील वाहतूक नियंत्रण शाखेच्या प्रमुखांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नसल्याने प्रमुखांचा या प्रकरणात काही स्वार्थ आहे का असा तर्क लावण्यात येत आहे.