नगर जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवण्याच्या उद्देशाने अजित पवार यांच्याकडून ही खेळी खेळली जाणार…
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | MLA SANGRAM JAGTAP | AJIT PAWAR'S IDEA OF GIVING SANGRAM JAGTAP A SEAT AS MINISTER OF STATE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पुढच्याच आठवड्यात राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार अपेक्षीत आहे. तसे संकेत अधिकृत सुत्रांकडून प्राप्त झाले आहेत. काहींना मंत्रिमंडळावर नियुक्ती मध्ये प्राधान्य देऊन यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. विशेषतः काही नवीन चेहर्यांना यामध्ये संधी देण्याची दाट शक्यता आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
आमदार संग्राम जगताप यांची वर्णी लागणार….
दरम्यान शिंदे गटाकडून कोणाची वर्णी लागते याहीपेक्षा अजित पवार गटाकडून त्यांच्या कोट्यातील रिक्त असणार्या मंत्रीपदाच्या जागांपैकी राज्यमंत्रीपदावर नगरचे आमदार संग्राम जगताप यांची वर्णी लागणार असल्याचे माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे. नगर जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवण्याच्या उद्देशाने अजित पवार यांच्याकडून ही खेळी खेळली जाणार असून त्याद्वारे युवा मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.लोकसभा निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग येणार आहे. सध्या बर्याच मंत्र्यांकडे मोठ्या प्रमाणात खाती असल्याने त्यांना त्या विभागांना पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही.