TIMES OF AHMEDNAGAR
अयोध्येत २२ जानेवारी २०२४ या दिवशी राम मंदिरात राम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या तिघांच्या , तसंच साधू-संतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नुकतीच अयोध्येतल्या मंदिरात रामनवमी साजरी झाली आणि सूर्यतिलक सोहळाही पार पडला. आता रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही ? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
राम मंदिर होऊन गेलं आता त्याविषयी लोकांमध्ये चर्चा नाही. – शरद पवार
एका मिटिंगमध्ये माझ्यापुढे विषय निघाला त्यात महिलांनी अशी तक्रार केली की रामाचं सगळं बोलत आहात मग सीतेची मूर्ती का बसवत नाही ? मी महाराष्ट्रात फिरतो आहे. मला अनुकूल चित्र दिसतं आहे. राम मंदिर होऊन गेलं आता त्याविषयी लोकांमध्ये चर्चा नाही. तसंच या सरकारविषयी नाराजी आहे. असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल का ? हा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.