कल्याण रोड वरील ते अल्पवयीन लेकरं मासे पकडायला गेले अन मृत्युच्या जाळ्यात अडकले.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | KALYAN ROAD NEWS | AKASH LALU NISAD | GHANSHYAM RAJU MUKHI | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर : महावितरणाच्या बेजबाबदार कारभाराबद्दल अनेक तक्रारी होत असतांना आता एका नवीन घटनेमुळे पुन्हा महावितरण चर्चेत आले हा. शेतातून गेलेल्या महावितरणच्या वाहिनीची तार तुटून खाली पडली या तारेचा शॉक बसल्याने आता दोघा शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नगर कल्याण रोडवरील रेल्वे उड्डाणपूल परिसरात नेप्ती गावच्या शिवारात मंगळवारी (दि.२४) सायंकाळी हि घटना घडली आहे.
(संग्रहित दृश्य.)
वीज प्रवाह तारेतून बंधाऱ्याच्या पाण्यात उतरला.
विजेचा शॉक बसल्याने या दुर्घटनेत आकाश लालू निसाद (वय १२) व घनश्याम राजू मुखीचा (वय १२, दोघे रा. दिनेश हॉटेल मागे, कल्याण रोड,अहमदनगर) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या सोबत असलेला एक जोडीदार सुदैवाने बचावला आहे. मयत आकाश लालू निसाद (वय १२) व घनश्याम राजू मुखीचा आणि त्यांचा एक मित्र असे तिघे जण मंगळवारी (दि.२४) सायंकाळी ४.३० ते ५ च्या सुमारास नेप्ती शिवारात रेल्वे लाईनच्या पुढील बाजूस बायपास रस्त्याच्या जवळ असलेल्या एका बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी गेले होते. त्या बंधाऱ्याजवळून महावितरणची वीजवाहिनी गेलेली आहे. या वाहिनीची एक तार तुटून ती बंधाऱ्याजवळ पडलेली होती. त्या तारेतून बंधाऱ्याच्या पाण्यात वीज प्रवाह उतरलेला असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
(संग्रहित दृश्य.)
वीज वाहिनीवरील वीज पुरवठा खंडित करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात.
मासे पकडण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एक जण पाण्यात उतरताच त्याला विजेचा शॉक बसून तो पाण्यात बुडाला, तर दुसरा तेथून पळायला असतांना त्याचा तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने त्यालाही शॉक बसला. त्यामुळे दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हे पाहून त्यांचा तिसरा साथीदार घाबरून घराकडे पळत आला. त्याने घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर मयत मुलांच्या नातेवाईकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ही माहिती नगर तालुका पोलिसांना मिळताच स.पो.नि. प्रल्हाद गिते यांनी पोलिसांचे पथक पाठविले. महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून वीज वाहिनीवरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला त्यानंतर दोन्ही मयत मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास महिला अंमलदार रेपाळे या करीत आहेत.