दिल्लीमध्ये आहे ‘आप’ नगरमध्ये आहे आमदार संग्राम जगताप ; तुम्हाला काय मागायचे ते मागा, पण माझे मंत्रीपद काही मागू नका !
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | UNION MINISTER RAMDAS ATHAWALE | MLA SANGRAM JAGTAP | SURESH BANSODE | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर : अहमदनगर येथील सहकार सभागृह येथे आयोजित संविधान सन्मान महामेळाव्यात केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार रामदास आठवले आपल्या शेरो शायरीच्या अंदाजामध्ये म्हणाले की “दिल्ली मध्ये आहे आप नगरमध्ये आहे, आमदार संग्राम जगताप” व “वक्त आयेगा तो मै दे दूंगा मेरी जान लेकिन किसीको बदलने नहीं दूंगा मेरे बाबासाहेब का संविधान” असे रामदास आठवले म्हणाले. आठवले पुढे बोलत होते ते म्हणाले नरेंद्र मोदी बढा रहे हैं देश कि शान नहीं बदल सकता भारत का संविधान” अशा खुमासदार भाषणाने केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार रामदास आठवले यांनी नगर येथील सहकार सभागृह येथे आयोजित संविधान सन्मान मेळाव्यास संबोधित केले.
(आमदार संग्राम जगताप.स्त्रोत सोशल मिडिया.)
“दिल्ली मध्ये आहे आप नगरमध्ये आहे, आमदार संग्राम जगताप”
यावेळी प्रमुख अतिथी म्हूणन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे उपस्थित होते. यावेळी पीआरपीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, आरपीआयचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जेष्ठ नेते अशोक गायकवाड, विजय वाघचौरे, सुवेंद्र थोरात, राजाभाऊ कापसे, सुनील साळवे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा.माणिक विधाते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना ना. आठवले म्हणाले प्रा. कवाडे सर व मी आम्ही दोन नेते संविधानाला मजबूत करणारे नेते आहोत. मी १९९० ला मंत्री झालो त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यावेळेला मी कवाडे सरांना म्हणालो होतो. माझ्यासोबत चला पण सर त्यावेळेस आले नाही. मग मी शरद पवार यांना पाठिंबा दिला व मंत्री झालो. आता माझा एकही खासदार नसतांना मला तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री पदाची संधी नरेंद्र मोदी साहेबांनी दिली आहे. कारण आमच्या पक्षामुळे नरेंद्र मोदी देखील तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. यावेळी प्रा. कवाडे यांच्याकडे पाहत मंत्री आठवले म्हणाले सर तुम्हाला काय मागायचे ते मागा, पण माझे मंत्रीपद काही मागू नका असे म्हंटल्यावर उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यामध्ये खळ खळून हशा पिकला. यावेळी त्यांनी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामाचे कौतुक केले.
(संग्रहित दृश्य.)
सर्वोच्च न्यायालयात बसवलेला बाबासाहेबांचा पुतळा शहरात उभारणार
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे यांनी आपल्या मनोगतात संविधानाविषयी माहिती सांगून संविधान सन्मान मिळाव्याचे कौतुक केले व शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे विकास कामे जोरात चालू असून लवकरच अहमदनगर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून ही प्रतिमा सर्वोच्च न्यायालयातील बसवलेला बाबासाहेबांचा पुतळा हाच शहरात उभारण्यात येणार असूनही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप म्हणाले की, हा मेळावा कोणताही खुलासा करण्यासाठी नसून संविधानाचा गौरव करण्यासाठी संविधान सन्मान मेळावा आयोजित केला असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
(संग्रहित दृश्य.)
तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल सन्मान.
यावेळी नामदार रामदास आठवले हे तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल रामदास आठवले व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला व संविधान सन्मान मेळाव्याचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या विकास कामाबदल त्यांचा आठवले व प्रा. कवाडे यांच्या उपस्थितीत मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र शिवाजीराव गर्जे यांची विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे व रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरोदे याचा सन्मान केला. तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे,निमंत्रक सुमेध गायकवाड, अजय साळवेयांनी केले.
(संग्रहित दृश्य.)
संविधान सन्मान मेळाव्यास उपस्थित.
संविधान सन्मान मेळाव्यास जेष्ठ नेते विजय भांबळ, प्रा. विलास साठे , प्रा. जाधव , संभाजी भिंगारदिवे, विजय जगताप, प्रकाश साळवे, प्रा. जयंत गायकवाड, महेश भोसले, किरण दाभाडे, सुरेश भिंगारदिवे, गणेश साळवे, अमित काळे, नितीन साळवे, नितीन कसबेकर, सारंग पटेकर, विशाल गायकवाड, विनोद साळवे, जितेंद्र कांबळे, विनायक संभागळे, जयाताई गायकवाड, गौतमी भिंगारदिवे, हिराबाई भिंगारदिवे, सदाशिव भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, अविनाश भोसले, विवेक भिंगारदिवे, दया गजभिये,निखिल साळवे, अनुराधाताई साळवे, सुनीता पाचारणे,सुमन काळापहाड, शबाना शेख, नयन खंदाऱे, पूनम जोशी, मनीषा खंडागळे, वदंना पातारे, नंदा जगताप, राधा पाटोळे, चंद्रभागा कांबळे, अनिता आंग्रे, रखमाबाई कांबळे, करुणा खातून आदीसह फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.