केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुजय विखेंच्या प्रचारासाठी नगर मध्ये दाखल , सभेत विखेंसाठी कवितेबरोबरच शरद पवारांना केले हे आवाहन……
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | UNION MINISTER RAMDAS ATHAWALE | MP SUJAY VIKHE | GUARDIAN MINISTER RADHAKRISHNA VIKHE | FORMER MINISTER RAJKUMAR BADOLE | NATIONALIST CONGRESS PARTY PRESIDENT SHARAD PAWAR | PRIME MINISTER NARENDRA MODI | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांच्या चाहत्यांना जास्त आवडते ते म्हणजे त्यांची कविता ते त्यांच्या शीघ्र कवितेंसाठी प्रसिद्ध आहेत.त्यांनी नगरमध्ये सुजय विखेंच्या प्रचारार्थ बोलतानाही आपल्या काव्यातून भाष्य करत सुजय विखेंचा विजय मांडला. “तुम्ही मनामध्ये ठेवू नका कोणतेही भय… कारण निवडून येणार आहेत सुजय…” असे काव्य करताच समर्थकांनी टाळ्या वाजवत साद दिली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
काँग्रेसने पवार यांना पंतप्रधान केले नाही
आठवले यांनी मोदी हे मुस्लिम विरोधी नसल्याचे व काँग्रेसनं शरद पवार यांना पंतप्रधान होऊ न दिल्याचा दावाही यावेळी केला आहे. खासदार डॉ. सुजय विखे व शिर्डीतील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आठवले नगरला आले असता त्यांनी मीडियाशी देखील संवाद साधत अनेक राजकीय गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे माजी मंत्री डॉ. राजकुमार बडोले हे देखील उपस्थित होते.शरद पवार यांनी महायुतीमध्ये यायला पाहिजे हे माझे आताचे नव्हे तर पूर्वीपासूनचे आवाहन आहे. याचे कारण असे की काँग्रेसने पवार यांच्यावर अन्याय केलाय. पंतप्रधानपदाची संधी असतानाही काँग्रेसने पवार यांना पंतप्रधान केले नाही तर मनमोहन सिंग यांना ती संधी दिली.असे दोनदा केले आहे. त्यामुळे ज्यांनी पवारांना डावलले अन्याय केला अशा काँग्रेसमध्ये त्यांनी त्यांचा पक्ष विलीन न करता महायुतीमध्ये आले पाहिजे असे मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत.
स्त्रोत सोशल मिडिया
नरेंद्र मोदी मुस्लिम विरोधी नाही तर….
भाजप चारशे पार झाले तर संविधान बदलले जाईल व लोकशाही धोक्यात येईल असा दावा काँग्रेस करत असली तरी देशाची लोकशाही नव्हे तर काँग्रेसच धोक्यात आलेली असल्याचे रामदास आठवले म्हणाले आहेत. चारशे पारच्या नाऱ्यातून संविधान बदलणार नाही तर उलट संविधान मजबुतीकरण होणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. काँग्रेस सध्या भेदभावाचे वातावरण निर्माण करत आहे. घटनेनुसार धार्मिक आधारावर आरक्षण देता येत नसते परंतु काँग्रेस ओबीसीमधून मुस्लिम आरक्षण देण्याचा प्रचार करत असल्याचे ते म्हणाले. नरेंद्र मोदी मुस्लिम विरोधी नाही तर ओबीसीमधून मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या भूमिके विरोधात असल्याचेही आठवले म्हणाले.