नागरदेवळे येथील भ्याड हल्ला प्रकरणी जीवेमारण्याचा प्रयत्न करणच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही. याउलट आरोपींना मदत होईल असे कृत्य स्थानिक नेत्यांच्या मध्यस्तीने होत असल्याचे समजते. माजी. सरपंच राम पानमाळकर यांच्या मुलाचा त्या हल्ल्यात सहभाग होता. हि काळ्या दगडावरची पांढरी रेष असली तरी,सत्तेच्या चष्म्यात हे रेष मिटवण्याचा काही लोकांकडून प्रयत्न केला जात आहे.
माजी. सरपंच राम पानमाळकर रात्रभर झोपलेच नाही. ?
टाइम्स ऑफ अहमदनगरने सत्यतेची पडताळणी करून विश्वसनीय सुत्रांच्यामाध्यामातून मिळवलेल्या माहितीनुसार काल बातमी प्रसिद्ध केली होती. सत्यता बाहेर आल्याने काही नेत्यांचे पांढऱ्या टोपीतले काळे कारनामे बाहेर येणार याचा अंदाज येताच काहींची धावपळ सुरु झाली. नागरदेवळे येथील २ तरुणांवर भयंकर हल्ला झाला. त्या तरुणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.त्यातील एका मुलाची काल खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली.अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या शेख कुटुंबाकडून सामाजिक मदत घेऊन रुग्णालयाचे उपचाराचे पैसे भरले जात आहेत.मात्र या तरुणांवर हल्ला झाला यावेळी माजी. सरपंच राम पानमाळकर हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.त्यांचा चिरंजीव व्यंकटेश हा हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.याची माहीती काल प्रसिद्ध होताच माजी. सरपंच राम पानमाळकर यांनी “मी नाही त्यातली,कडी लाव आतली.” कार्यक्रम सुरु केला.आणि रात्रभर जागून लोकांना आपल्या गटात आणण्याचा यशस्वी प्रत्यत्न केला.सकाळी सात ते आठच्या दरम्यान साहेब मला वाचवाचा नारा पानमाळकर यांनी एका माजी आमदाराच्या घरी दिला.
व्यंकटेश हा हल्ल्यात सहभागी,निवेदनात देखील नाव,पोलिसांसमोर उभा असलेला व्यंकटेश अटक का नाही ?
नागरदेवळे येथील भ्याड हल्ल्यात माजी. सरपंच राम पानमाळकर यांचा मुलगा व्यंकटेश राम पानमाळकर हा सहभागी होता. फिर्यादींनी वारंवार व्यंकटेशच्या नावाचा उल्लेख केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात व्यंकटेश याच्यासह पुष्कर शेलार,संतोष शेलार,उदय शेलार,अभिजित धाडगे,तेजस चौधरी,शुभम सत्रे,कैलास शिंदे,शिवम होणे,आकाश शिंदे,हरीश बनकर,दिनेश काटकर, यांच्या देखील नावाचा उल्लेख आहे. माजी. आमदाराच्या घरी सकाळी सात ते आठ वाजता जमलेल्या गर्दीत व्यंकटेश हा देखील उपस्थित होता. व्यंकटेश हा उपस्थित होता याचे नवल नाही मात्र काही तासांनंतर पोलीस देखील त्या ठिकाणी हजर झाले होते.व्यंकटेशचे नाव निवेदनात असतांना देखील पोलिसांनी त्याला कोणत्याही चौकशीकामी ताब्यात घेतले नाही. पोलीस कोणाच्या दबावखाली काम करत आहेत. जर असेल तर फिर्यादींना न्याय मिळेल का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
अल्पसंख्याक समाजाच्या घरांवर बाबा बोल्डोजार ?
नागरदेवळे हल्ला प्रकरणात आता बड्या नेत्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केलेई आहे. एका माजी आमदाराच्या घरी आपल्या चुकीचा पश्चाताप करायला गेलेल्या काही लोकांनी मदत मागितली. जास्त लोकांची गर्दी पाहून माजी. आमदारांचे संतुलन बिघडले. उपस्थित पोलिसांसमोर आमदारांनी अनेक मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या. माझ्या नादी लागल तर यांचे घरदार बुलडोझरने उध्वस्त करून टाकील अशी थेट धमकीच या माजी.आमदारांनी दिली आहे.शहरातील एका भाईला फोन करत त्यांना उचलून माझ्याकडे आन जरा असा थेट आदेशाच या माजी.आमदारांनी दिला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.