Knife attack की ताज़ा खबरे हिन्दी में | ब्रेकिंग और लेटेस्ट न्यूज़ in Hindi - Zee News Hindi(संग्रहित दृश्य.)

पोलिसांवर चाकूने हल्ला…

पोलीस शिपाई चाफले याचे घर बियर बारच्या मागे आहे. त्यामुळे शिपाई चाफले व चव्हाण पायदळ घराकडे जात असताना मागून युवकांची टोळी आली आणि रात्रीचा अंधार बघून गल्लीतच युवकांनी चव्हाण व चाफले या दोन्ही पोलिसांवर गुप्ती व चाकूने सपासप वार केले. यात युवकांनी चव्हाण यांच्या छातीत गुप्ती आरपार टाकल्याने तो तिथेच पडला तर चाफले यांच्या हात व छातीवर गुप्तीने वार केल्याने गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बघून आजूबाजूचे लोक धावले आणि दोन्ही पोलीस शिपाई यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी चव्हाण यांना मृत घोषित केले तर चाफले याला डॉ. चेपुरवार यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचीही प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अति.पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एकुरे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या हत्या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी वाढली आहे. खुनाचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समोर आली आहे. या प्रकरणी दाद महाल वॉर्ड येथील तीन युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात आणखी काही युवकांचा समावेश आहे. ते फरार आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सांगितले.