SANTOSH DESHMUKH / DHANANJAY DESHMUKH / MLA SURESH DHAS / बीड : जर धनंजय मुंडे हे दोषी नसतील तर त्यांच्यावर कारवाई करू नका, पण आरोपींना मदत करणारे जे लोक अद्याप बाहेर मोकाट फिरत आहेत ते कुणाचे कार्यकर्ते आहेत, हे पण शोधा. आम्ही कधीच निर्दोष लोकांवर कारवाई करा असं म्हणलो नाहीत आणि म्हणणार ही नाहीत. पण ज्यांचा दोष आहे हे आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी सांगतोय, त्या लोकांवर सुद्धा अद्याप कारवाई का झाली नाही ? किंबहुना बीडची बी टीम कोण चालवतंय ? असा संतप्त सवाल सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बी टीम अद्याप बाहेरच आहे, हे आम्ही यापूर्वी सुद्धा पुराव्यानिशी पोलिसांना कळविले आहे. त्यांचे नाव दिले, त्यांची तक्रार सुद्धा केली आहे. मात्र पोलीस त्यांना का पकडून कारवाई करत नाहीत? हा आमचा प्रश्न आहे. हे लोक उद्या एखादं आणखी गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य करणार नाहीत याची आम्हाला भीती वाटते आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे प्रमुख आरोपी आज जेलमध्ये आहेत त्यांना गाडी पुरवणारे, पैसे पुरवणारे कस्टडीमध्ये असताना रग किंवा बिसलरी बाटल्या अशा प्रकारचे साहित्य पुरवणारे अद्याप पोलिसांनी या लोकांना सह आरोपी का केले नाही ? असेही धनंजय देशमुख म्हणाले आहे.
(संग्रहित दृश्य)
विशेष पथक अंबाजोगाईत तळ ठोकू
महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्थापन केलेल्या पथकाने गुरुवारी परळीत झाडाझडती सुरु केली आहे. महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास अधिक गतीने व्हावा यासाठी सीआयडी किंवा एसआयटी कडे द्यावा अशी मागणी कुटुंबियांकडून होत आहे. आता त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षकांनी एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल असे पाच जणांचे विशेष पथक या प्रकरणाच्या तपासासाठी नेमले आहे. या पथकाने काल परळीत झाडाझडती घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.हे पथक अंबाजोगाईत तळ ठोकून बसले आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
(संग्रहित दृश्य.)
सुदर्शन घुलेची चौकशी होणे बाकी होती…..
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याची सीआयडीने पुन्हा कस्टडी घेतली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला पूरक खंडणी प्रकरणाचा गुन्हा आहे आणि या खंडणी प्रकरणांमध्ये सुद्धा सुदर्शन घुले याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र या प्रकरणात अद्याप सुदर्शन घुले याची चौकशी झाली नव्हती, म्हणून न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेला पुन्हा पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आले आहे. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये यापूर्वीच वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेची चौकशी झाली आहे. मात्र सुदर्शन घुलेची चौकशी होणे बाकी होती. आत पोलीस कस्टडीमध्ये सुदर्शन घुलेचे व्हाईस सॅम्पल घेतले जाणार आहेत. सध्या सुदर्शन घुलेला केज शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. अशातच आता सुदर्शन घुलेला केज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आणले आहे. दोन दिवसाच्या पोलीस कस्टडीनंतर आज (१४ फेब्रुवारी) पुन्हा सुदर्शन घुलेला पोलीस कस्टडी मिळते की न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी होते यावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे.