५० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये किमान १०-२० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून का दिला नाही. डॉ.निलेश लंकेंचा विखेंना सवाल.
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | MAHARASHTRA | AHMEDNAGAR SOUTH LOK SABHA CONSTITUENCY | SUJAY VIKHE | NILESH LANKE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
आमचा हेडमास्तरपावर बाज आहे.कारण“पावर इज अ पवार आणि पवार इज अ पॉवर”पवार साहेबांनी जर गुगली टाकली ना तर केंद्रात महाविकासआघाडीचे सरकार येईल. पवार यांच्या आदेशानुसार आम्ही संयमानं बोलत आहोत. मात्र आमच्यावर वैयक्तिक पातळीवरची टीका करण्यापूर्वी जरा विचार करा. लोकसभेची निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनेच लढवा. ‘चार्टर्ड प्लेन’ ने कोण कुठे जातं, हे आम्हाला चांगलंच माहित आहे असा हल्लाबोल नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश लंके यांनी सुजय विखे यांचं नाव न घेता केला.
स्त्रोत.सोशल मिडिया.
कंपन्याबंद पाडल्या !
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत डॉ.निलेश लंके बोलत होते. ते म्हणाले या मतदारसंघात ५० वर्षांपासून त्यांची (विखेंची) सत्ता आहे असं तेच सांगताहेत. मग या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये त्यांनी किमान दहा – वीस हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून का दिला नाही ? नुसत्याच विकासाच्या गप्पा मारायच्या याला काही अर्थ नाही.
त्यांनी रोजगार निर्मिती तर केली नाहीच. राहुरी साखर कारखाना बंद पाडला. मुळा – प्रवरा वीज पुरवठा कंपनी बंद पाडली. नुसती बंद पडली नाही तर शासनाचे २ हजार २०० कोटी रुपये थकवले. संस्था उभ्या करण्याऐवजी त्यांनी संस्था संपविण्याचा घाट घातला. त्यामुळे आता या निवडणुकीत यांना संपवा. आणि मला संधी द्या असे आवाहन निलेश लंके यांनी केले आहे.