फौजी ने केली करणी सेनेच्या प्रमुखांची हत्या,पत्रिका देण्याच्या निमित्ताने हल्लेखोर घुसले होते घरात.
लॉरेंस बिश्नोई गँगचे रोहित गोदारा यांनी सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे.
कोण होते सुखदेव सिंह गोगामेडी ?
रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांची महत्वाची भूमिका असलेल्या पद्मावत चित्रपटाला केलेल्या विरोधामुळे आले होते चर्चेत. पद्मावत चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना केली होती मारहाण.
सुखदेव सिंह गोगामेडी यांनी बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना ‘पद्मावत’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर थप्पड मारली होती. गोगामेडी यांनी या चित्रपटाला खूप विरोध केला होता. या चित्रपटाचे नाव ‘पद्मावती’ ठेवण्यात आले होते, पण राजपूत करणी सेनेच्या विरोधानंतर निर्मात्यांना चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ ठेवावे लागले होते. तसेच अनेक दृश्येही चित्रपटातून हटवली गेली होती. या चित्रपटाला केलेल्या विरोधानंतरच सुखदेव सिंह गोगामेडी राजपूत समाजातील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते.
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची मंगळवारी जयपूरमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती.
यांच्या हत्येतील दोन आरोपींची ओळख पटवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. परंतु हत्या का झाली हे स्पष्ट झाले नव्हते.

कोण आहेत आरोपी ?
आरोपींपैकी एकाचे नाव रोहित राठौर असे आहे.हा मूळचा मकराना नागौर येथील रहिवासी आहे.तर दुसरा आरोपी नितीन फौजी हा मूळचा हरियाणाच्या महेंद्रगठ येथील आहे.सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी नवीन शेखावत, रोहित राठोड आणि नितीन फौजी या तिघांनी लग्नपत्रिका देण्याच्या बहाण्याने करणी सेना प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांची भेट घेतली होती.