भिंगारमध्ये प्राणघातक हल्ला का झाला ? पाकिटात दाबल्या जाईल प्रकरण ? सत्य आले समोर ….!
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR CRIME NEWS | AHMEDNAGAR POLICE | ILLEGAL BUSINESSES | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर शहरातील हल्लेखोरांची दहशत वारंवार वाढत चालली आहे. गुन्हेगारांना आवरण्यात व शहराला शांत ठेवण्यात स्थानिक पोलीस निरीक्षकांनी दंडुका देखील उचलला आहे. मात्र वरिष्ठांच्या इच्छेपुढे हे दंडुके गारद पडत असल्याचे शहरात बोलले जाते.शहरात अवैध धंद्यांचे कारभारीच दहशत पसरवत आहेत. हे नव्याने सांगणे गरजेचे नाही.
अवैध धंद्यांचा सूळसुळाट.
अहमदनगर शहरात अनेक दिवसांपासून कायदासुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अहमदनगर शहरातली गुंडगिरी एकेकाळी गाजली होती,मात्र खाकीशी प्रामाणिक असलेल्या अधिकाऱ्यांनी पाकिटाला भाव न देता शहरातली दहशत संपवली होती. शहरातील व जिल्हातील गरिकांची जबाबदारी आपले प्रथम कर्तव्य असल्याची जाण त्यांना होती. त्यामुळे लक्ष्मीच्या दर्शनाचे त्यांना घेणे-देणे नव्हते. मात्र आज शहराची परिस्तिथी पहिली तर पाकीट द्या अन अवैध धंदे करा अशी गत झाली आहे. ऑलंपिकच्या स्पर्धेपेक्षा जास्त महत्व अहमदनगर शहराच्या अवैध धंद्यांच्या स्पर्धेला प्राप्त झाले आहे.अशी चर्चा सध्या नगरकर दबक्या आवाजात करत आहेत.
अवैध धंद्यामुळेच प्राणघातक हल्ला.
भिंगारची रेकॉर्डवर ओळख हि कॅन्टोनमेंट म्हणून असली तरी भिंगाराची खरी ओळख हि अवैध धंद्यांचे साम्राज्य अशी आहे असे स्थानिक रहिवासी सांगतात. काल शनिवारी (दि.१० फेब्रुवारी) रोजी एका युवकावर हल्ला झाला. हा प्राणघातक हल्ला भिंगार येथील पत्त्यांच्या क्लबवर झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. भिंगार येथील भिमनगरमध्ये कॅसेटच्या दुकानामागे पत्त्त्यांचा मोठा क्लब चालवला जातो. मतीन मानक व्यक्तीकडे एका बिल्डरने थोड्यावेळासाठी गाडी देण्याची विनंती केली.मतीनने त्या बिल्डरला गाडी दिली खरी मात्र त्या बिल्डरने ती गाडी एका पत्त्याच्या क्लबवर (जुगार अड्डा ) गहाण ठेवली. काही वेळेच्या प्रतीक्षेनंतर मतीनयाने त्या बिल्डरला फोन केला मात्र त्या बिल्डरचा फोन बंद लागल्याने मतीन याचे संतुलन बिघडले मतीनने त्या बिल्डरची माहिती घेतली असता तो पत्त्याच्या क्लबवर (जुगार अड्डा ) आढळून येईल अशी माहिती मतीन याला मिळाली मतीनने शहरातील पत्त्याच्या क्लबवर (जुगार अड्डा ) धाव घेतली त्यावेळी बिल्डर हा मुनोत यांच्या पत्त्याच्या क्लबवर (जुगार अड्डा ) असल्याचे समजले. त्यावेळी बिल्डर हा मतीन यांना आढळून आला मतीनने बिल्डरकडे गाडीची मागणी केली. त्यावेळी बिल्डरने मतीनला सांगितले कि तुम्ही बाहेर थांबा मी तुमची गाडी थोड्यावेळात देतो. तासभराच्या प्रतीक्षेनंतर संतप्त झालेल्या मतीनने चालू पत्त्याच्या क्लबवर (जुगार अड्डा ) तळ ठोकला.आणि मला गाडी पाहिजे असा जोर धरला. संबंधित मालकांनी गाडी मेळेल जरा थांब अस बोलले त्यानंतर मी पोलिसांना संबंधित प्रकारची माहिती देईल असा दम दिला. त्यावेळी पत्त्याच्या क्लबवर (जुगार अड्डा ) मालक यांनी मतीन यांना मारहाण केली यावेळी मतीन यांना तीन ते चार जणांनी बदडले आणि काय करायचं ते कर असा दम दिला या हल्ल्यानंतर मतीन याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली.
उद्याच्या अंकात पहा.
पहा पाकिटात कैद झाली घटना.अन हत्याकांड दाबल्या गेले.