सध्या लगीन सराई सुरु आहे. अनेक तरुण विवाह बंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत. मात्र एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. लग्न १० दिवसांवर आलेलं असताना नवरदेवाने नवरीसोडून सासूबाईंला घेऊन पळून जात लगीनगाठ बांधली आहे. त्यामुळे दोन्हीकडील नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यावेळी सासूने अडीच लाख रुपये कॅश आणि चांदीचे दागिने तसेच घरातील हाती लागेल त्या वस्तू आणि संपत्ती घेऊन सासू मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळाली आहे. दरम्यान याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पळून गेलेल्या सासूच्या नवऱ्याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. अलिगढ जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातून हा प्रकार समोर आला आहे. गावातील एका वडिलांनी आपल्या मुलीचं लग्न दादोन पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणाशी ठरवलं होतं. त्यांचा विवाह १६ एप्रिल रोजी होणार होता. नातेवाईकांमध्ये पत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. मात्र लग्न १० दिवसांवर येऊन ठेपलेलं असताना नवरी मुलीच्या आईने प्रताप केला. चक्क होणाऱ्या जावयासोबत पळून जात लग्न केलं आणि घरातील संपत्तीही नेली. या घटनेमुळे व्यथित झालेली नवरी सतत रडत आहे. त्यामुळे त्या मुलीची प्रकृती बिकट झाली आहे. होणार्या नवरदेवाने त्याच्या वडिलांना फोनवर सांगितले की शोधण्याचा प्रयत्न करू नका आम्ही परत येणार नाही.
(संग्रह्ती दृश्य.)
पोलिसांकडून पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरु
मद्रक पोलिस स्टेशनचे प्रभारी अरविंद कुमार माहिती देताना म्हणाले की महिलेच्या पतीने लेखी तक्रार दिली आहे. यानंतर महिलेची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि तिचा शोध घेतला जात आहे. तो मुलगाही त्या दिवसापासून बेपत्ता आहे. पण दोघेही कुठे एकत्र गेले आहेत की नाही हे स्पष्ट नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि लवकरच संपूर्ण घटना स्पष्ट होईल. शिवानी असं नवरी मुलीचं नाव आहे. तिचं १० दिवसांत लग्न होणार होतं. लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. मात्र या सगळ्यात मोठा ट्विस्ट आला. शिवानीची आई नवरदेवासोबत पळून गेली. त्यामुळे शिवानीची प्रकृती खालावली आहे.