जिल्हा परिषदमध्ये बहादुरांनी चक्क शासनालाच लावला गंडा.
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा परिषद,अहमदनगर मधील आर्थिक भ्रष्टाचाराच्या बातम्या आपण ऐकत असतोच.जिल्हा परिषदेच्या आर्थिक भ्रष्टाचाराच्या बातम्या आपल्याला नवीन नाहीत.पण आज नवीन भ्रष्टाचाराच्या बातम्या येत आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार जिल्हा परिषद येथे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कागदपत्रामध्ये भ्रष्टाचार केला आहे. (खोटी कागदपत्रे देऊन शासनाची फसवणूक)
जिल्हा परिषदमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बोगस कागदपत्रे शासकीय दप्तरात जमा केले आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी शासनाला हूल देणारे शासकीय पदाधिकारी व कर्मचारी हे आता पोलिसांच्या रडारवर आहेत. अपंगत्व नसताना काही बहाद्दुरांनी दिव्यांग असल्याचे दाखले दिले, तर काही महिलांनी तर चक्क घटस्पोटाचे कागदपत्रे जमा केले आहेत. इच्छितस्थळी बदली करवून घेण्यासाठी त्या महिलांनी अशी लढवली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ऑफिसर्स …….
येस सर …….
गेट रेडी …..!