Reading:जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु निर्माण करण्यासाठी आमदार जगतापांची धावपळ, जगतापांच्या पाठपुराव्यामुळे वाडियापार्क क्रीडा संकुलला एकूण ५२ तर पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी मंजूर.
जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु निर्माण करण्यासाठी आमदार जगतापांची धावपळ, जगतापांच्या पाठपुराव्यामुळे वाडियापार्क क्रीडा संकुलला एकूण ५२ तर पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी मंजूर.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | MLA SANGRAM JAGTAP | NAGAR WADIA PARK SPORTS COMPLEX | 15 CRORES SANCTIONED BY THE GOVERNMENT FOR CONSTRUCTION OF WADIA PARK SPORTS FACILITIES AND CONSTRUCTION OF SPORTS FACILITIES | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
वाडियापार्क क्रीडा संकुल येथील क्रीडा सुविधांचे निर्मितीकरण व नवीन खेळाडुंच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडून पाहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. वाडियापार्क क्रीडा संकुल हे अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडुंसाठी मुख्य केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी क्रीडा सुविधांचे निर्मितीकरण व नवीन खेळाडुंच्या क्रीडा सुविधा खेळाडुसाठी निर्माण व्हाव्यात यासाठी शासनाकडे सुमारे ५२ कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्यावतीने राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक संपन्न झाली असून आज वाडियापार्क क्रीडा संकुलच्या क्रीडा सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
खेळाडुंना विविध खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
खेळाडुंना विविध खेळाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून सारसनगर येथे विविध खेळांचे क्रीडा संकुल उभे करण्यात आले असून त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. सारसनगर येथील क्रीडा संकुलात खेळाडुंना विविध खेळाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. वाडियापार्क क्रीडा संकुलात खेळाडुंना चांगल्या दर्जेच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी यापूर्वी पाहणी केली होती. त्यानुसार आज मंत्रालयामध्ये बैठक झाली आहे. वाडियापार्क क्रीडा संकुलाचे निर्मितीकरण करण्यासाठी व नवीन खेळाडुंच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. भविष्यकाळात वाडियापार्क क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अहमदनगर शहरात व जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु निर्माण होतील असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
वाडिया पार्क संकुलात विविध खेळाच्या सुविधा उपलब्ध होणार.
वाडिया पार्क संकुलात विविध खेळाच्या सुविधा उपलब्ध होणार असून मैदानावर लॉन तयार करण्यात येणार आहे. किक्रेट खेळांडूसाठी आंतराराष्ट्रीय दर्जेच्या तीन टर्फ विकेट तयार करण्यात येणार आहे. फ्लड लाईटची सुविधा उपलब्ध होणार आहे. याच बरोबर धाव पट्टूंसाठी ४०० मीटर धावण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. तसेच कुस्ती पटुंसाठी, मातीचा हौद, बॉक्सिंग, बॅडमिंटन हॉल तयार करण्यात येणार आहे. रायफल शुटींग, या साठी अत्याधुनिक सुविधा असलेले मैदान निर्माण करण्यात येणार आहे. २ सिथेंटीक टेनिस कोर्ट ची निर्मीती करण्यात येणार आहे. कबड्डी, खो–खो व बास्केट बॉलची मैदाने तयार करुण त्यावरती डोम कव्हर बसविण्यात येणार आहे. तसेच खेळाचे समोलचन करण्यासाठी कक्षाची निर्मीती करण्यात येणार आहे. याच बरोबर वाडीया पार्कच्या संपुर्ण प्रेक्षक बैठक व्यवस्थेला रोप कव्हर बसविण्यात येणार आहे. तसेच संपुर्ण वाडियापार्कमध्ये सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येणाऱ्या नागरीकांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक जिमची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक खेळाच्या मैदानाजवळ खेळाडुंसाठी अत्याधुनिक व्यायामशाळेची निर्मीती करण्यात येणार आहे. या माध्यमातून खेळाडु व नागरीकांचे आरोग्य सद्रुढ व निरोगी राहण्यास मदत होईल. अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली आहे.