चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची विक्री होऊन व्यापार केला जातो. चाईल्ड पॉर्नोग्राफीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने अशा पद्धतीच्या प्रकारात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक सायबर पोलिसांकडून ३५७ प्रोफाइल धारकांची माहिती तपासली जात आहे आणि त्यानंतर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. भारतामध्ये लहान मुलांचे नग्न फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात आणि त्यानंतर चाईल्ड पॉर्नोग्राफी वाढण्यास त्याची मदत होते. त्यामुळे अशी कोणत्याही प्रकारचे लहान मुलांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू नये किंवा पोस्ट करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे. मात्र, चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सायबर पोलिसांच्या तपासात नेमकं काय निष्पन्न होणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.