अनैतिक संबंधांच्या संशयावरून बायको आणि पोटच्या मुलींना जिवंत जाळले.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR POLICE | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | TALUKA POLICE STATION | HUSBAND BURNS WIFE ALIVE ON SUSPICION OF IMMORAL RELATIONSHIP | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव लांडगा येथे दोन मुलींसह आईचा मृत झाला आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी सुनील लांडगे याला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून त्यांचे नेहमीच वाद होत होते. आज सकाळी (२५ मार्च) सुनील लांडगे व त्याच्या पत्नीत पुन्हा वाद झाला. त्याने पत्नीसह मुलींच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. या भीषण आगीत तिघींचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.
लीलाबाई सुनील लांडगे (आई), साक्षी व ख़ुशी (मुली) अशी मृतांची नावे असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती समजताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासाचे कार्य सूर आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.