बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री एका हुक्का पार्लरवर छापा टाकून काही जणांना ताब्यात घेतलं. त्यामध्ये स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.  हुक्का पार्लरमध्ये अवैध सेवन होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली होती.

बिग बॉस 17 की ट्रॉफी जीतने के बाद विवादों में घिरे मुनव्वर फारूकी | by  Vishal Singh | Jan, 2024 | Medium

अधिकाऱ्याने दिली माहिती.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी छापेमारी करून काही जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यात मुनव्वर फारुकीच्या नावाचाही समावेश आहे. आमच्या टीमला एका मुंबईतील एका हुक्का बारमध्ये हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही छापेमारी केली. तिथं सापडलेल्या वस्तूंची तपासणी केल्यानंतर काही लोकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मुनव्वर फारुकीचाही समावेश आहे. अशी माहिती या छाप्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली आहे.