TIMES OF AHMEDNAGAR
नगरच्या उड्डाणपुलाबाबत आणखी एक अपघात घडला आहे. मात्र हा अपघात उड्डाण पुलावरून नसून उड्डाण पुलाखाली झाला आहे. उड्डाणपूला खालून जाणाऱ्या एका गाडीवर पुलाच्या पिलरचा एक भाग कोसळला आहे. उड्डाणपूलाच्या पिलरचा एक तुकडा रस्त्यावर चालणाऱ्या चारचाकी वाहनावर पडताच मोठा आवाज झाला आणि ही गाडी चालवणाऱ्या पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्याला आपली गाडी बाजूला लावावी लागली.
अचानकपणे पिलरचा तुकडा गाडीवर कोसळला.
त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर गाडीवर भला मोठा पिलरचा सिमेंटचा भाग कोसळलेला होता त्यांनी ती गाडी तशीच थांबवली आणि विमा प्रतिनिधीला फोन केला. नियमित अपघातांची मालिका देणाऱ्या बहुचर्चित उड्डाण पुलावर पुन्हा एकदा काहीतरी अपघात झाला आहे आणि पूलाचा भाग खाली कोसळला आहे. अशी अफवा नगर मध्ये पसरली होती .बघ्यांची गर्दी त्या ठिकाणी झाली होती.काही राजकीय कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले आणि याचे चीत्रीकरण करू नका अशी विनंती पत्रकारांना केली.
Video Player
00:00
00:00