आरे बाप रे ! पवार साहेबांचं किती उदार अंतकरण आहे , फडणवीस यांचा शरद पवारांना टोला….
TIMES OFF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | NCP PRESIDENT SHARAD PAWAR | DEPUTY CHIEF MINISTER DEVENDRA FADNAVIS | FADNAVIS HAS COMMENTED ON SHARAD PAWAR'S CLAIM.| THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
विरोधकांनी काहीही जरी केले तरी भाजपा जिंकेल :फडणवीस
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. देशात एकूण सात टप्प्यांपैकी तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त खासदार आपल्याच पक्षाचे निवडून येतील असा दावा केला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात ३० ते ३५ जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा केला होता. शरद पवारांच्या या दाव्यावर फडणवीस यांनी भाष्य करत शरद पवारांना टोला लगावला आहे.सध्या सगळीकडे भारतीय जनता पार्टी असे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाला निवडून द्यायचे असे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चितच आहे. आमचे विरोधक वेगवेगळ्या प्रकारचा अजेंडा सेट करणे वेगवेगळे विधाने करणे षडयंत्र करने असे प्रकार पाहायला मिळत आहेत. मात्र त्यांनी काही केले तरी भाजपा जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे असे भाष्य फडणवीस यांनी केले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया.
त्यांनी ते मैदान बूक केले होते…..
मनसेला शिवाजी पार्क येथील मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मैदानावरुन ठाकरे गट आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली होती. यानंतर अखेर मैदान मनसेला मिळाले. यानंतर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर करण्यात आला होता. यावर फडणवीस यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले आहे. फडवणीस म्हणाले राज ठाकरे हे आमच्या महायुतीचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे त्यांना मैदानाची परवानगी मिळाली तर त्यामध्ये चूक काय आहे, त्यांनी ते मैदान बूक केले होते.
स्त्रोत सोशल मिडिया.
आरे बाप रे! पवार साहेबांचं किती उदार अंतकरण !
लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील. तर महायुतीला १३-१८ जागा मिळतील. असा दावा शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. यावर आता देवेंद्र फडणवीस म्हणाले शरद पवार यांनी महायुतीला १२-१३ जागा दिल्या. आरे बाप रे! पवार साहेबांचं किती उदार अंतकरण आहे असा टोला फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयासाठी विदर्भातील काँग्रेसचे काही नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. त्यामुळे काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता फडणवीस म्हणाले, काँग्रेसने साम, दाम, दंड , भेद अशी निती त्यांच्याकडून अवलंबवली जात आहे. मात्र, येत्या काळात कॉंग्रेस कोणत्याही थराला गेले तरी तरी जनता आमच्याबरोबर आहे असी टीका फडणवीस यांनी केली.